Jio चा खास प्लॅन; 98 रुपयांमध्ये मिळेल दररोज 1.5GB डेटा, फ्री कॉलिंग

recharge
rechargeGoogle

Reliance Jio ने नुकताच आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉंच केला आहे. जिओचा हा 98 रुपयांचा प्लॅन असून Jio चे स्पर्धक Airtel आणि Vodafone-Idea कडे 100 रुपयांपेक्षा कमीत असा कोणताही प्लॅन नाही, जो या रिचार्ज प्लॅनशी स्पर्धा करू शकेल. 100 रुपयांच्या आत हा एकमेव रिचार्ज प्लॅन आहे, ज्यात दररोज 1.5GB डेटा दिला जातो. या जिओच्या किफायतशीर प्लॅनमध्ये इतर कोणते फायदे आहेत आणि Voda-Idea, Airtel सोबत 100 रुपयांच्या खाली कोणते अनलिमीटेड प्लॅन उपलब्ध आहेत ते पाहूयात.

Jio चा 98 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनची वैधता 14 दिवसांची असून जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB हायस्पीड डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 21GB डेटा दिला जातो. प्लॅन कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ देते. जिओच्या या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये फ्री एसएमएस देण्यात आलेले नाहीत.

recharge
Tata आणि Maruti च्या या दोन नव्या CNG कार; देतील दमदार मायलेज

Vodafone-Idea प्लॅन्स

व्होडाफोन-आयडिया ( Vi) चे 19 आणि 99 रुपयांचे सर्वात स्वस्त प्लॅन आहेत. दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमीटेड कॉलिंगचे फायदे उपलब्ध आहेत. 19 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 2 दिवसांची आहे आणि त्यात 200MB डेटा मिळेल. त्याचबरोबर 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये 18 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये एकूण 200MB डेटा उपलब्ध आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये एसएमएस फ्री देण्यात आले नाहीत

एअरटेलचा रिचार्ज प्लॅन

100 रुपयांच्या खाली अनलिमीटेड प्लॅनमध्ये एअरटेलचा 19 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. एअरटेलच्या 19 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 2 दिवसांची असून या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमीटेड कॉलिंग उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 200 एमबी डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये एसएमएस देण्यात आले नाहीत.

recharge
पुढच्या महिन्यात येतेय Tata ची CNG कार; मिळेल जबरदस्त मायलेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com