Reliance Jio : VIP Number हवाय? सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि घरबसल्या मिळवा VIP नंबर

तुमच्या आवडीचा हटके मोबाईल नंबर
Reliance Jio
Reliance Jioesakal

Reliance Jio : कोणाला VIP नंबर नको असतो. या अशा नंबरची क्रेझ गावापासून ते शहरापर्यंत सगळ्यांना असते. यासाठी जियोने आपल्या ग्राहकांसाठी खास VIP मोबाईल नंबरची ऑफर आणली आहे.

इथे तुम्ही तुमच्या आवडीचा हटके मोबाईल नंबर निवडू शकाल. म्हणजे जर तुमची जन्मतारीख 4 असेल, तर तुम्ही 0401 मालिका मोबाईल नंबर निवडू शकता. अशा प्रकारचे बरेच VIP नंबर तुम्ही निवडू शकता. पण जिओची ही खास ऑफर जिओ प्लस पोस्टपेड यूजर्ससाठी आहे. विशेष म्हणजे ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या VIP मोबाईल नंबरसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया.

Reliance Jio
Weight Gain Tips:  लुकड्या शरीरावरून लोकांनी टोमणे मारून हैराण केलंय? हे सुपरफूड बनवतील तुम्हाला सुदृढ!

ऑनलाइन VIP नंबरसाठी कसा अर्ज कराल?

सर्वप्रथम तुम्हाला जिओच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर सेल्फकेअर आणि नंतर चॉईस नंबर ऑप्शनवर जावे लागेल.

जिथे तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल, ज्याचं वेरिफिकेशन करावं लागेल.

Reliance Jio
Mobile Charging Tips : केवळ फोनच नाही, तर चार्जरमध्येही लागू शकते आग; अशी घ्या खबरदारी!

वेरिफिकेशननंतर, एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमच्या पसंतीचे 4 अंक टाकावे लागतील, जे तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरमध्ये पहायचे आहेत.

हे 4 अंक एंटर केल्यानंतर, तुमच्यासमोर अनेक 10 अंकी मोबाइल नंबरचे पर्याय दिसतील, ज्यामधून तुम्ही कोणताही एक नंबर निवडू शकता.

Reliance Jio
ताप आल्यावर फक्त गोळ्या खाऊ नका, करा हे घरगुती उपाय Health Tips

त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला Pay Now या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी UPI, Google Pay, PhonePe, क्रेडिट आणि डेबिट कार्ड पर्याय मिळतील.

मग तुम्ही 499 रुपये भरल्यास तुमच्या नावावर एक नवीन मोबाईल नंबर जारी केला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com