Jio, Airtel, Vi - 200 रुपयांमध्ये अनलिमिडेट कॉलसह डेटा, एक कंपनी देतेय 2 लाखांचा विमा

टीम ई सकाळ
Monday, 8 February 2021

टेलिकॉम कंपन्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स देत असतात. रिलायन्स जिओशिवाय एअरटेल, व्होडाफोन- आयडिया या कंपन्यासुद्धा नवनवीन ऑफर देत आहेत.

नवी दिल्ली - टेलिकॉम कंपन्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स देत असतात. रिलायन्स जिओशिवाय एअरटेल, व्होडाफोन- आयडिया या कंपन्यासुद्धा नवनवीन ऑफर देत आहेत. यामध्ये कमी किंमतीमध्ये जास्त डेटा आणि फ्री कॉलिंग या सेवा दिल्या जातात. या तीनही कंपन्यांचे काही धमाकेदार प्लॅन आहेत जे 200 रुपयांपेक्षा कमी आहेत. डेटा आणि फ्री कॉलिंगशिवाय इतरही काही फायदे यात दिले जातात. यात 2 लाख रुपयांच्या इन्श्युरन्सचा समावेश आहे. 

जिओ
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे जिओचे दोन प्लॅन आहेत. यात 149 रुपयांमध्ये दररोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्रत्येक दिवशी 100 फ्री एसएमस मिळणाऱ्या या प्लॅनची मुदत 24 दिवसांसाठी आहे. यासोबत सबस्क्रायबर्सना जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. 

हे वाचा - फक्त 10 मिनिटांत स्मार्टफोनचं चार्जिंग होणार फुल्ल; येतेय नवीन टेक्नॉलॉजी

जिओचा 199 रुपयांचासुद्धा एक प्लॅन असून यामध्ये प्रत्येक दिवशी दीड जीबी इंटरनेट मिळतं. याची मुदत 28 दिवसांची असून अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएससुद्धा मिळतात. यातही जिओ अ‍ॅप्सचा फ्री अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

एअरटेल
एअरटेलच्या युजर्ससाठी 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील तीन बेस्ट प्लॅन आहेत. कंपनीने 149 रुपयांचा प्लॅन दिला असून यामध्ये 28 दिवसांसाठी प्रत्येक दिवशी 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. याशिवाय विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्स्ट्रीमचा फ्री अ‍ॅक्सेस, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओची 30 दिवसांची फ्री ट्रायल मिळते. या प्लॅनमध्ये 300 फ्री एसएमएससुद्धा दिले जातात. 

स्वस्त प्लनमध्ये एअरटेलनं 179 रुपयांचा प्लॅनही दिला आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग, 300 फ्री एसएमएस, 2 जीबी डेटाही ऑफर दिली जात आहे. या प्लॅनची मुदत 28 दिवस असून कंपनी सब्सक्रायबर्सना 2 लाख रुपयांचा Bharti Axa Life Insurance सुद्धा देत आहे.

हे वाचा - सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये BSNL ने मारली बाजी, एअरटेल आणि व्होडा-आयडिया मागे

एअरटेलचा आणखी एक 199 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये प्रत्येक दिवशी 1 जीबी इंटरनेट डेटा, 100 एसएमएस यासह अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये प्राइम व्हिडिओची 30 दिवसांची फ्री ट्रायल आणि एअरटेल एक्सट्रीम, विंक म्यूझिकचे फ्री सबस्क्रिप्शनही दिले जाते. 

व्होडाफोन-आयडिया
व्होडाफोन आयडीचेसुद्धा 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे तीन प्लॅन आहेत. यात 148 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह प्रत्येक दिवशी एक जीबी इंटरनेट डेटा आणि 100 एसएमएस फ्री दिले जातात. हा प्लॅन 18 दिवसांसाठी आहे. तर 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा दिला जातो. तसंच 300 एसएमस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याची मुदत 28 दिवसांसाठी असते. 149 रुपयांच्या प्लॅनसोबत कंपनीला अ‍ॅप किंवा वेबसाइटवरून रिचार्ज केल्यास एक जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. सोबतच Vi Movies आणि TV बेसिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

Vi चा 199 रुपयांचा प्लॅनही लोकप्रिय असून यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह प्रत्येक दिवशी एक जीबी इंटरनेट डेटा मिळतो. तसंच 100 फ्री एसएमएसही मिळतात. या प्लॅनची मुदत 24 दिवस इतकी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reliance jio vodafone airtel recharge offer plan