Jio Laptop : जिओ लाँच करणार 4G लॅपटॉप; किंमत ऐकून व्हाल थक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JioBook Laptop

Jio Laptop : जिओ लाँच करणार 4G लॅपटॉप; किंमत ऐकून व्हाल थक्क

भारतात कमी बजेटमध्ये 4G फोन लॉन्च केल्यानंतर, रिलायन्स जिओ आता आपला पहिला कमी किंमतीचा लॅपटॉप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने याचे नाव JioBook ठेवले आहे. हा लॅपटॉप ऑक्टोबर 2022 मध्ये लॉन्च होईल. जिओने Qualcomm (QCOM.O) आणि माइक्रोसॉफ्ट Microsoft सोबत 4G JioBook साठी भागीदारी केली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, जिओ लॅपटॉपची किंमत $184 म्हणजेच सुमारे 15,000 रुपये असेल.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, JioBook शाळा आणि सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या ग्राहकांसाठी ऑक्टोबर 2022 पर्यंत उपलब्ध होईल. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत बाजारपेठेत उपलब्ध होईल. सुरुवातीला Jio 4G एम्बेडेड सिम कार्डसह नवीन JioBook लाँच करेल, त्यानंतर त्याची 5G आवृत्ती लॉन्च केली जाईल. Jio 5G फोन लॉन्च झाल्यानंतर JioBook चे 5G इलेक्ट्रोनिक उपकरणे बाजारात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा: Netflix OTT : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर केल्यास भरावे लागणार अतिरिक्त शुल्क?

JioBook मध्ये आर्म लिमिटेड टेक्नॉलॉजीची प्रोसेसर चिप असेल. तसेच, हा लॅपटॉप Jio OS आणि Windows OS वर चालवला जाऊ शकतो. जिओबुकची निर्मिती फ्लेक्सद्वारे (Flex) भारतात केली जाईल.

टॅग्स :PriceLaptopreliance jio