Google Pixel 6 सिरीजचे रेंडर्स झाले लीक; जाणून घ्या या फोन्सच्या संभाव्य फीचर्सबद्दल

Google Pixel 6 सिरीजचे रेंडर्स झाले लीक; जाणून घ्या या फोन्सच्या संभाव्य फीचर्सबद्दल

नागपूर : Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro हे दोन फोन लवकरच लाँच केले जाणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र त्याआधीच आता या फोन्सचे रेंडर्स लीक झाले आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्या फीचर्सबद्दल. (Renders of Google pixel series 6 leaked)

Google Pixel 6 सिरीजचे रेंडर्स झाले लीक; जाणून घ्या या फोन्सच्या संभाव्य फीचर्सबद्दल
उपराजधानी हादरली! शहरात 4 तासांत तब्बल दोन हत्याकांड; तडीपार गुंडांला संपवलं

गूगल पिक्सल 6 (Google Pixel 6)आणि पिक्सल 6 प्रो (Pixel 6 Pro) च्या रेंडरवर नजर टाकल्यास फोनच्या मागील पॅनेलमध्ये ड्युअल-टोन फिनिश डिझाइन देण्यात आले आहे. या दोन्ही हँडसेटच्या शीर्षावर नारंगी आणि तळाशी पांढरा रंग आहे. तसेच फोनच्या मागील पॅनेलमध्ये दोन कॅमेरे एलआयडी लाईटसह देण्यात आले आहेत. आता फ्रँटबद्दल सांगायचं तर छोटा पंच-होल कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर गुगल पिक्सल 6 आणि पिक्सेल 6 प्रो या दोन्हीच्या फ्रंट पॅनेलमध्ये सापडतील.

Google पिक्सेल 6 चे संभाव्य स्पेसिफिकेशन

लीक झालेल्या अहवालानुसार गूगल पिक्सल 6 व्हाईटचॅपल प्रोसेसरसह सुसज्ज असेल. हा एक मिड रेंज चीपसेट आहे. या व्यतिरिक्त, आगामी Google पिक्सल 6 मध्ये अल्ट्रा वाइड बँड तंत्रज्ञानास समर्थन दिले जाऊ शकते. याशिवाय, प्रगत तंत्रज्ञान, एचडी डिस्प्ले आणि शक्तिशाली बॅटरीसह कॅमेरा सेटअप भविष्यातील स्मार्टफोनमध्ये आढळू शकेल

गुगल पिक्सल 6 प्रो चे संभाव्य स्पेसिफिकेशन

आतापर्यंत उघड झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार गुगल पिक्सल 6 प्रो स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्लेसह शक्तिशाली प्रोसेसर आणि बॅटरी मिळू शकते. यासह, डिव्हाइसमध्ये एक 64 एमपी कॅमेरा दिला जाऊ शकतो. याशिवाय फारशी माहिती मिळाली नाही.

Google Pixel 6 सिरीजचे रेंडर्स झाले लीक; जाणून घ्या या फोन्सच्या संभाव्य फीचर्सबद्दल
स्मशानभूमीत नागरिकांना अचानक आली दुर्गंधी; जाऊन बघताच उडाला थरकाप

लीकवर विश्वास ठेवल्यास, Google पिक्सेल 6 सिरीज ऑगस्टमध्ये लाँच केली जाईल आणि डिव्हाइसची किंमत प्रीमियम श्रेणीमध्ये ठेवली जाईल.

(Renders of Google pixel series 6 leaked)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com