GTA 6 Trailer : कधी येणार नव्या 'ग्रँड थेफ्ट ऑटो' गेमचा ट्रेलर? अखेर कंपनीने सांगितली तारीख

Online Gaming : गेल्या दशकभरापासून गेमर्स नव्या जीटीए गेमची वाट पाहत आहेत.
GTA 6 Trailer
GTA 6 TrailereSakal

GTA 6 Trailer Date : पीसी गेमर्ससाठी एक मोठी खुशखबर आहे. बहुप्रतिक्षित GTA 6 या गेमचा ट्रेलर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार असं यापूर्वी सांगण्यात येत होतं. आता याची नेमकी तारीख समोर आली आहे. Rockstar Games ने आपल्या एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.

मंगळवारी, म्हणजेच 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता (स्थानिक वेळेनुसार) हा ट्रेलर लाँच होणार असल्याची माहिती रॉकस्टार गेम्सने दिली आहे. या पोस्टला अवघ्या काही तासांमध्ये 16 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच, चार लाखांहून अधिक वेळा याला रिपोस्ट करण्यात आलं आहे.

गेमर्सची आतुरता शिगेला

ग्रँड थेफ्ट ऑटो सीरीजमधील GTA Vice City, GTA San Andreas या गेम्स अगदी लोकप्रिय ठरल्या होत्या. 2013 साली आलेल्या GTA 5 ने तर विक्रीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. यानंतर जगभरातील गेमर्स या गेमच्या पुढील व्हर्जनची वाट पाहत होते. आता याचा ट्रेलर लाँच जवळ आल्यामुळे गेमर्सची आतुरता शिगेला पोहोचली आहे. (Gaming News)

GTA 6 Trailer
GTA 6 Leaks : नव्या 'ग्रँड थेफ्ट ऑटो' गेममध्ये काय काय असणार? लीक्ड फुटेजमधून समोर आली माहिती

नेटफ्लिक्सवर मेजवानी

दरम्यान, नेटफ्लिक्सने मोबाईल गेमर्सना एक मोठी मेजवानी दिली आहे. नेटफ्लिक्स गेम्समध्ये आता चक्क GTA गेम्स खेळता येणार आहेत. GTA ट्रिलॉजीमधील पहिल्या तीन गेम्स लवकरच नेटफ्लिक्स सबस्क्राइबर्सना मोफत उपलब्ध होतील. मात्र केवळ ठराविक अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसेसना या गेम्स सपोर्ट करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com