रॉयल एनफिल्डचं 'ते' मॉडेल होणार इतिहासजमा

Royal Enfield classic and bullet thunder bird 500cc valid for sale till 31 March
Royal Enfield classic and bullet thunder bird 500cc valid for sale till 31 March

दशकापूर्वी वर्ष २००८ मध्‍ये रॉयल एनफिल्‍ड 'बुलेट क्‍लासिक ५००' सादर करण्‍यात आली. तेव्‍हापासून कंपनीच्‍या हॉलमार्क यूसीई ५०० सीसी सिंगल-सिलिंडर मोटरसायकलने रॉयल एनफिल्‍डच्‍या लाँग-स्‍ट्रोक कॅरेक्‍टर वारसाला उच्‍च स्‍तरावर नेले आहे आणि राइडर्सच्‍या मनावर छाप पाडली आहे. आज आपल्‍याला माहित आहे की, या ५०० सीसी मोटरसायकल्‍स क्‍लासिक ३५०च्‍या उदयाचे प्रतीक होत्‍या आणि जगभरात रॉयल एनफिल्‍डच्‍या यशामध्‍ये साह्यभूत ठरल्‍या आहेत.  

भारतात ५०० सीसी सिंगल-सिलिंडर, लाँग-स्‍ट्रोक, युनिट कन्‍स्‍ट्रक्‍शन इंजिन मोटरसायकल्‍सचे उत्‍पादन थांबवण्‍याची घोषणा करत आज रॉयल एनफिल्‍डने एण्‍ड–ऑफ-प्रॉडक्‍शन, स्‍पेशल सिरीज मोटरसायकल्‍स, क्‍लासिक ५०० ट्रिब्‍यूट ब्‍लॅक लिमिटेड एडिशनची घोषणा केली. या मोटरसायकल्‍स आयकॉनिक लाँग-स्‍ट्रोक सिंगल सिलिंडर यूसीई ५०० सीसी इंजिन असणा-या भारतातील शेवटच्‍या असणार आहेत आणि फक्‍त मर्यादित उत्‍पादनामध्‍ये उपलब्‍ध असणार आहेत. या प्रत्‍येक मोटरसायकल्‍सवर संस्‍मरणीय हॉलमार्क 'एण्‍ड ऑफ बिल्‍ड' सिरीयल नंबर प्‍लाक असणार आहे, जे मोटरसायकल मालकासाठी अद्वितीय ठरणार आहे. या मोटरसायकल्‍स १० फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मर्यादित कालावधीमध्‍ये ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्‍ध असणार आहेत. आजपासून https://www.royalenfield.com/in/en/classic500tributeblack/ येथे ऑनलाइन विक्रीसाठी सुरूवात होईल.  

कंपनी ३१ मार्च २०२० नंतर भारतात सध्‍याच्‍या ५०० सीसी मोटरसायकल्‍सची रिटेल विक्री बंद करणार आहे. पण या मोटरसायकल्‍स इतर सर्व आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये उपलब्‍ध असणार आहेत. भारतातील सर्व डिलरशिप्‍समध्‍ये सध्‍याच्‍या मालकांसाठी सर्विस व स्‍पेअर्स सुविधा सुरू राहिल. 

रॉयल एनफिल्‍ड क्‍लासिक ५०० ट्रिब्‍युट ब्‍लॅक लिमिटेड एडिशन मोटरसायकल्‍समध्‍ये २००९ मध्‍ये रॉयल एनफिल्‍ड थिरूवोट्टीयूर केंद्रामधून सादर करण्‍यात आलेल्‍या क्‍लासिक ५०० मोटरसायकल्‍सप्रमाणे प्रख्‍यात व आयकॉनिक पिन-स्ट्रिप असेल. पहिल्‍यांदाच रॉयल एनफिल्‍डमधील फ्यूएल टँकवर ड्युअल टोन स्किमसह ग्‍लॉसी ब्‍लॅक व मॅट ब्‍लॅक रंगामधील फेंडर्स असणार आहे. हे अनोखे ऑल-ब्‍लॅक-लिव्‍हरी व ड्युअल-टोन रंग मोटरसायकलच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतात. एण्‍ड ऑफ बिल्‍ड्स स्‍पेशल एडिशन बॅज आणि फॅशनेबल ऑल-ब्‍लॅक थीमसह क्‍लासिक ५०० ट्रिब्‍यूट ब्‍लॅक ही ग्राहकांची सर्वोत्तम एडिशन आहे. 

या घोषणेबाबत बोलताना रॉयल एनफिल्‍डचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विनोद दासारी म्‍हणाले, ''२००९ पासून रॉयल एनफिल्‍ड ५०० सीसी मोटरसायकल्‍सने भारतातील मध्‍यम-वजनाच्‍या मोटरसायकलिंग विभागासाठी अभिमानाने मंच निर्माण केला आहे. विशेषत: क्‍लासिक ५००ने सबलाइम रेट्रो-चिक डिझाइन व सर्वसमावेशक राइड अनुभवासह विविध आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये रॉयल एनफिल्‍डला भव्‍य यश मिळवून दिले. आम्‍ही रॉयल एनफिल्‍ड ५०० सीसी मोटरसायकल्‍सचा शेवट करत असताना क्‍लासिक ५०० ट्रिब्‍युट ब्‍लॅक ही उत्‍साहींसाठी रॉयल एनफिल्‍डच्‍या मोटरसायकलिंग इतिहासाचे मालक बनण्‍याची एक संधी आहे.'' 

६५० ट्विन मोटरसायकल्‍सचे सादरीकरण रॉयल एनफिल्‍डसाठी स्‍पष्‍ट प्रगतीकारी उत्‍पादन आणि लाखो रॉयल एनफिल्‍ड ग्राहकांसाठी मूळ सुधारणा असलेला पर्याय होता. रस्‍त्‍यावरील उत्तम राइड व कॅरेक्‍ट संपन्‍न इंजिनासह उच्‍च शक्‍तीचे ट्विन सिलिंडर असलेल्‍या मोटरसायकल्‍स इन्‍टरसेप्‍टर आयएनटी ६५० व कॉन्टिनेन्‍टल जीटी ६५०ने त्‍वरित जगभरातील मोटरसायकलप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. हे यश आणि जागतिक ग्राहकांकडून जलदपणे मिळालेली स्‍वीकृती पाहता ६५० ट्विन मोटरसायकल्‍स ३५० सीसीवरून अपग्रेड करणा-या रॉयल एनफिल्‍ड ग्राहकांसाठी किंवा १५० सीसीवरून २०० सीसीमध्‍ये अपग्रेड करणा-या मोटरसायकलिस्‍ट्ससाठी एक नैसर्गिक अपग्रेड पर्याय बनल्‍या आहेत.  

'लास्‍ट ऑफ द ५००' क्‍लासिक ट्रिब्‍युट ब्‍लॅक लिमिटेड एडिशनची १० फेब्रुवारी रोजी ऑनलाइन विक्रीला सुरूवात होईल. रॉयल एनफिल्‍ड स्थिरता, अविरत आकर्षकता व वैशिष्‍ट्यपूर्ण रचनेचा वारसा असलेल्‍या मोटरसायकल्‍स सादर करणे सुरूच ठेवेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com