Royal Enfield Classic 350 चं नवीन मॉडेल बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत

Royal Enfield Classic 350 चं नवीन मॉडेल बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत

‘बुलेट’ची निर्मिती करणारी ख्यातनाम कंपनी म्हणजे ‘रॉयल एनफील्ड’. आतापर्यंत या कंपनीचे प्रत्येक मॉडेल्स भारतात लोकप्रिय ठरलं आहे. यामध्येच कंपनीचं आपल्या सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक Classic 350 बुलेटचं नवीन वर्जन लाँच केलं आहे. या नव्या बुलेटचं नावदेखील Classic 350 असून त्याच्या लूक आणि फिचर्समध्ये नवीन बदल करण्यात आले आहे. 

2021 Royal Enfield Classic 350 : 

खासकरुन तरुणांची आवडनिवड लक्षात घेऊन ही बुलेट डिझाइन करण्यात आली आहे. त्यामुळे यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात बॉडीलाइन आणि ग्राफिक्सच्या दृष्टीनेही त्यात अनेक बदल केले आहेत.

कसं आहे बुलेटचं इंजिन-

रॉयल एनफील्ड ही बुलेट त्यांच्या दमदार इंजिनमुळे कायमच चर्चेत असते. Royal Enfield Classic 350 या नव्या बुलेटमध्ये कंपनीने ३४९ सीसीचं इंजन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन सिंगल सिलेंडर एअर कुलर आहे. या इंजिनमुळे बुलेटमध्ये होणारं व्हायब्रेशन किंवा एक्स्ट्रा हीट नियंत्रणात राहते. या इंजिनमध्ये २०.२ बीएचपी पॉवरची क्षमता असून २७ एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

टेक्नॉलॉजी -

नव्या दमाच्या Royal Enfield Classic 350 मध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये बुलेटच्या ट्रीपर नेव्हिगेशन सिस्टीमची सर्वाधिक चर्चा होत आहे.  या सिस्टीममुळे बुलेट चालवतांना बाइकर्सला अॅप्पल आणि अॅन्ड्रॉइडचे फोन किंवा अन्य उपकरणे जोडू शकतो. टर्न बाय टर्न फीचरचा वापर करता येऊ शकतो. बुलेटचा मीटर डिस्प्ले पहिल्यापेक्षा जास्त अत्याधुनिक करण्यात आला आहे. तसंच बुलेटच्या सीटची रचनाही आरामदायक करण्यात आली आहे.

Royal Enfield Classic 350 मध्ये नवीन ब्रेक सिस्टीम, नवीन व्हिल्स, ३०० एमएमचा फ्रण्ट डिस्क ब्रेक आणि २७० एमएमचा रिअर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.बाईकला फ्रण्टमध्ये १९ इंच आणि बॅक १८ इंच स्पोक व्हील देण्यात आला आहे. तसंच खराब रस्त्यावर बुलेट व्यवस्थित चालावी यासाठी यात फ्रण्टला १३५ एमएस आणि रिअरमधअये १३० एमएमचा गॅस चार्ज शॉक ऑब्जर्वरचा सस्पेंशन्स देण्यात आला आहे.

काय आहे नव्या Enfield Classic 350 ची किंमत 

जुन्या Enfield Classic 350 च्या तुलनेत नव्या Enfield Classic 350 मध्ये अनेक नव्या अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नव्या बुलेटची किंमतीही त्याचप्रमाणे ठरवण्यात आली आहे. त्यानुसार, नव्या दमाची Enfield Classic 350 ची किंमत १.८० लाख रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com