टेक्नोहंट : जीपीटी-४ : तंत्रज्ञानातील नवा आविष्कार

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट-जीपीटीने मध्यंतरीच्या काळात तंत्रज्ञानविश्वात बराच धुमाकूळ घातला.
GPT-4
GPT-4Sakal
Summary

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट-जीपीटीने मध्यंतरीच्या काळात तंत्रज्ञानविश्वात बराच धुमाकूळ घातला.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट-जीपीटीने मध्यंतरीच्या काळात तंत्रज्ञानविश्वात बराच धुमाकूळ घातला. चॅट-जीपीटीची निर्माती कंपनी असलेल्या ओपन एआयने आता आणखी एक पाऊल पुढे टाकत जीपीटी-४ ही नवी सेवा सुरू केली. जीपीटी-४ मध्ये मजकुरासोबतच एखादे चित्रही इन्पुट म्हणून दिल्यास त्यावरून हवी ती माहिती अवघ्या काही क्षणात उपलब्ध होते. तसेच कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, व्हिडिओ गेमिंग, स्पर्धा परीक्षेतील प्रश्न सोडवण्यासह अन्य कामेही चुटकीसरशी केली जाते. तंत्रज्ञानविश्वातील या नव्या आविष्काराबाबत थोडक्यात...

चॅटजीपीटीनंतर आता ओपनएआय कंपनीचे नवे उत्पादन असलेल्या जीपीटी-४ ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चॅटजीपीटी आणि मायक्रोसॉफ्ट बिंग यांचा वापर करून तुमची-आमची अनेक कामे अगदी सोपी करणार आहे. गेल्या १४ मार्चला ही सेवा लॉन्च झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत जीपीटी प्रणालीला इन्पुट म्हणून केवळ मजकूर स्वरूपात माहिती वा प्रश्न विचारला, तरच त्याकडून तुम्हाला अपेक्षित असलेले उत्तर मिळत होते. आता मात्र जीपीटी-४ मध्ये कागदावर काढलेले चित्र, नकाशा वा अन्य मजकूरही स्कॅन स्वरूपात दिल्यास त्यावरून तुम्हाला अपेक्षित असलेली माहिती, सादरीकरण एवढेच नव्हे, तर कॉम्प्युटर प्रोग्रामिंगदेखील जीपीटी-४ कडून तुम्हाला काही क्षणात उपलब्ध होते.

आश्चर्याची बाब म्हणजे जीपीटी-४ प्रणालीने जागतिक पातळीवरील विविध प्रवेश परीक्षांचे प्रश्न सोडवले असता, जवळपास ८० ते ९० टक्के उत्तरे बरोबर दिल्याचे समोर आले आहे. या प्रणालीचा वापर करून काही मिनिटांमध्ये व्हिडिओ गेम्सही तयार करता येतात. सध्या प्रायोगिक तत्त्वांवर ड्युलिंगो, स्ट्राईप; तसेच खान अकादमीला जीपीटी-४ ची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तूर्तास सर्वांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध नसून २० डॉलर प्रतिमहिना दराने ती वापरता येणार आहे.

जीपीटी - ४ मध्ये नवे काय?

1) जीपीटीमध्ये आतापर्यंत केवळ मजकूर हा इन्पुट म्हणून दिला जात होता. आता मात्र जीपीटी - ४ ही बहुआयामी प्रणाली असून त्यात चित्र, नकाशे किंवा कागदावर काढलेला आराखड्यावरूनही हवे ते उत्तर दिले जाते.

2) लार्ज लॅंग्वेज मॉडेलचा (एलएलएम) वापर केल्याने जीपीटी - ४ मध्ये सहजपणे मोठ्या प्रमाणात डेटा हाताळला जातो. एकावेळी जीपीटी - ४ कडे एकावेळी ६० ते ८० हजार शब्द हाताळण्याची क्षमता आहे. यापूर्वीच्या प्रणालीत ही क्षमता केवळ ८ हजारांपर्यंत मर्यादित होती.

3) जीपीटीच्या पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत जीपीटी-४ मध्ये मिळणाऱ्या उत्तरांची अचूकता जवळपास ४० टक्कांनी वाढली आहे. ओपन एआयने दिलेल्या माहितीनुसार, जीपीटी-४ ने युनिफॉर्म बार एक्झाम, एलसॅट, जीआरई आदी प्रमुख परीक्षांत जवळपास ८० ते ९० टक्के प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.

4) आतापर्यंत जीपीटीमध्ये केवळ इंग्रजी भाषेचा वापर होत होता. आता मात्र जीपीटी - ४ मध्ये लार्ज लॅंग्वेज मॉडेलचा वापर केल्याने इंग्रजीव्यतिरित्त अन्य भाषेतील मजकूर हाताळला जाऊ शकतो.

उत्पन्नाचे नवे स्रोत

1) चॅटबोट : चॅटजीपीटी; तसेच जीपीटी - ४ चा वापर करून तुम्ही एखाद्या कंपनीसाठी त्यांच्या ऑनलाईन सेवांबाबत चॅटबोट तयार करून त्याची विक्री करून शकता.

2) कंटेट सेवा : जीपीटीचा वापर करून विविध विषयांवरील लेख, ई-बुक, ब्लॉग किंवा पुस्तकांच्या स्वरूपात लिहून त्याची विक्री करू शकता. गमरोड, फिव्हर हे कंटेंटच्या खरेदी-विक्रीचे संकेतस्थळ बरेच नावाजलेले आहे.

3) वेबिनार व शैक्षणिक साहित्याची निर्मिती : या प्रणालीच्या मदतीने तुम्ही शालेय अभ्याससाहित्य किंवा एखाद्या विषयावरील वेबिनार तयार करून त्याची ग्राहकांना विक्री करू शकता.

4) गेमिंग : विविध प्रकारचे ऑनलाईन गेम विकसित करण्यासाठी जीपीटी -४ चा वापर करता येतो. त्यानुसार गेम तयार करून ते संबंधितांना विकता येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com