टेक्नोहंट : आरोग्याची ‘डिजिटल’ काळजी

सातत्याने अद्ययावत होणाऱ्या आणि बदलत्या काळाचा वेध घेणाऱ्या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रातील वापर कमालीचा वाढला आहे.
health digital care
health digital caresakal
Summary

सातत्याने अद्ययावत होणाऱ्या आणि बदलत्या काळाचा वेध घेणाऱ्या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रातील वापर कमालीचा वाढला आहे.

सातत्याने अद्ययावत होणाऱ्या आणि बदलत्या काळाचा वेध घेणाऱ्या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रातील वापर कमालीचा वाढला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - एआय) आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक किचकट गोष्टी सोप्या झाल्या. आरोग्य क्षेत्रातही एआयचा वापर करून विविध आजारांच्या निदानासह रुग्णांवरील शस्त्रक्रियांपासून औषधोपचारापर्यंत सर्वकाही सहज झाले आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर कसा केला जातो, त्याबाबत...

1) आजारांचे विश्लेषण : एआयच्या मदतीने रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, अनुवांशिकता, जनुकीय माहिती आणि एखाद्या आजाराच्या लक्षणांचे विश्लेषण करून संबंधित रुग्णाचा रिपोर्ट तयार करता येतो. अशा प्रकारे शेकडो रुग्णांच्या माहितीचे विश्लेषणही करून उपचारपद्धती निश्चित करता येते. शिवाय एखाद्या रुग्णावर नेमके कोणकोणते उपचार करता येईल, याबाबत डॉक्टरांनाही निर्णय घेण्यास मदत होते.

2) प्रभावी औषधोपचार : एखाद्या आजाराची साथ आल्यास किंवा एकसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढल्यास उपलब्ध माहितीचे एआयच्या मदतीने विश्लेषण करता येते. त्यावरून औषधनिर्मात्या कंपन्यांना कोणत्या प्रकारची औषधांची निर्मिती करावी लागेल, याबाबत निर्णय घेता येतो. तसेच वैयक्तिक पातळीवर रुग्णांच्या लक्षणांनुसार औषधोपचाराबाबतही एआयची मदत घेतली जाते.

3) दूरस्थ रुग्णांचे निदान : ग्रामीण अथवा दुर्गम भागातील रुग्णांचे निदान करण्यासाठी एआयचा प्रभावी वापर करता येणे शक्य आहे.

रुग्णांची लक्षणे, त्यांना होणारा त्रास आदींबाबत वेअरेबल्स गॅजेट्स वा अन्य स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून उपचारपद्धती निश्चित करण्यास मदत होते. या प्रकारे आजाराचे वेळेत निदान झाल्यास पुढील गंभीर प्रसंग टाळता येतो.

4) शस्त्रक्रियेसाठी मदत : शस्त्रक्रियेवेळी माहितीचे एआयच्या मदतीने रिअल-टाईम विश्लेषण करून डॉक्टरांना पुढील निर्णय घेण्यास मदत होते. परिणामी होणाऱ्या संभाव्य चुका टाळून शस्त्रक्रिया योग्य आणि अचूक पद्धतीने करता येतात.

5) आरोग्यविषयक माहितीचे व्यवस्थापन : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय माहिती गोळा केली आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात या माहितीचे तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आदी पातळीवर जतन करणे, त्याचे विश्लेषण करणे, वयोगटानुसार किंवा व्याधींनुसार आरोग्यविषयक योजना राबवणे, लसीकरण करणे आदींबाबत एआयचा प्रभावी वापर करता येतो.

6) आरोग्यविषयक चॅटबोट सेवा : रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शन किंवा शंकाचे निरसन करण्यासाठी एआयच्या मदतीने चॅटबोट सेवेचा वापर करता येतो. त्याद्वारे रुग्णांना कोणत्याही आरोग्यविषयक समस्यांविषयी किंवा एखादे औषध दिवसातून किती वेळा किती प्रमाणात घ्यायचे, यासाठी चॅटबोटचा चांगला वापर करता येतो.

7) साथरोगांबाबत मार्गदर्शन : अनेक भागात पावसाळा किंवा हिवाळ्यात साथीचे आजार हमखास येतात. दरवर्षी येणाऱ्या साथींच्या आजारांची माहिती आरोग्य यंत्रणेकडे असते. त्यानुसार कोणत्या भागात कोणत्या कालावधीत कोणत्या आजाराचे प्रमाण वाढते, याबाबतच्या माहितीचे एआयच्या मदतीने विश्लेषण करता येते. त्यानुसार आरोग्य यंत्रणेला पूर्वतयारी करता येणे शक्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com