टेक्नोहंट : आयपीएल : टीकेचे धनी, गुगलवर अग्रणी!

गेली दीड-दोन वर्ष भारतासह संपूर्ण जण कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनामुळे देशभरातील अनेक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली.
Google Trends
Google TrendsSakal
Summary

गेली दीड-दोन वर्ष भारतासह संपूर्ण जण कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनामुळे देशभरातील अनेक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली.

गेली दीड-दोन वर्ष भारतासह संपूर्ण जण कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनामुळे देशभरातील अनेक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली; मात्र सोन्याची अंडी देणारी आयपीएलच्या आयोजनाबाबत बीसीसीआय मात्र ठाम होती. त्यावरून बीसीसीआयवर टीकेची झोडही उठली; परंतु याच आयपीएल स्पर्धेबाबत जाणून घेण्यासाठी भारतीय नेटकरी सर्वाधिक सक्रीय होते. गुगलच्या इअर इन सर्च - २०२१’ या वर्षभरातल्या टॉप सर्चेसमध्ये ‘इंडियन प्रीमियर लीग’ने पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठले ट्रेण्ड सर्वाधिक सर्चमध्ये होते, याबाबतही या अहवालात मांडण्यात आले.

1) टॉप १० सर्च

वर्षभरात सर्वाधिक सर्च झालेल्या विषयांवर नजर टाकली, तर क्रीडा आणि कोरोना हे दोन विषय प्रामुख्याने ट्रेण्डमध्ये असल्याचे पाहायला मिळते. आयपीएल, टी-२० वर्ल्डकप, टोक्यो ऑलिम्पिक, युरो कपसोबतच कोविन पोर्टल आणि कोविड लशीबाबतही सर्वाधिक सर्च करण्यात आले.

  • इंडियन प्रीमियर लीग

  • कोविन

  • आयसीसी टी-२० वर्ल्डकप

  • युरो कप

  • टोक्यो ऑलिंपिक

  • कोविड व्हॅक्सिन

  • फ्री फायर रिडीम कोड

  • कोपा अमेरिका

  • नीरज चोप्रा

  • आर्यन खान

2) टॉप सर्च इन पर्सनॅलिटी

२०२१ वर्षात घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडींमुळे अनेक व्यक्तिमत्त्वे चर्चेत आली. टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेला नीरज चोप्रा वर्षभरातील सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये आघाडीवर होता. त्यापाठोपाठ क्रूझ पार्टीप्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेला आर्यन खान, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची गर्लफ्रेण्ड शहनाज गिल, तसेच पॉर्न व्हिडिओप्रकरणी उद्योगपती राज कुंद्रा यांच्याबाबत गुगलवर बरेच सर्च करण्यात आला.

  • नीरज चोप्रा

  • आर्यन खान

  • शेहनाज गिल

  • राज कुंद्रा

  • एलॉन मस्क

  • विकी कौशल

  • पी.व्ही. सिंधू

  • बजरंग पुनिया

  • सुशील कुमार

  • नताशा दलाल

3) टॉप 'नीअर मी' सर्चेस

'नीअर मी' हा सर्च गुगलवर मोठ्या प्रमाणात वापरला जातो. २०२१ या वर्षभरात ''नीअर मी'' सर्च अंतर्गत जवळपास कोविड लसीकरण केंद्र, कोविड चाचणी केंद्र, कोविड हॉस्पिटल कुठे आहे, याबाबत मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले. त्याचबरोबर लॉकडाऊनकाळात जवळपास फूड डिलिव्हरी, टिफीन सर्व्हिस, टेक अ वे सर्व्हिसबाबतही शोध घेण्यात आला.

  • कोविड व्हॅक्सिन

  • कोविड टेस्ट

  • कोविड हॉस्पिटल

  • ऑक्सिजन सिलिंडर

  • सीटी स्कॅन

4) सिनेमा

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दक्षिणेतील ‘जय भीम’ या चित्रपटावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. गुगल सर्चमध्येही ‘जय भीम’ची सर्वाधिक चर्चा झाली त्यापाठोपाठ शहीद कॅप्टन विक्रम बात्रा यांचा बायोपिक ‘शेरशाह’, सलमान खानचा ‘राधे’, हॉलिवूडचा चित्रपट ‘गॉडझिला Vs कॉंग’, तसेच ‘इटर्नल्स’ या चित्रपटाबाबत गुगलवर बरेच सर्च करण्यात आले.

  • जय भीम

  • शेरशाह

  • राधे

  • बेल बॉटम

  • इटरनल्स

5) फूड

खरंतर खाद्यसंस्कृतीची भारताला मोठी परंपरा आहे. वेगवेगळे पदार्थ, त्यांची रेसिपी जाणून घेण्याकडे अनेकांचा कल असतो. अनेकजण तर गुगल, यू-ट्यूबवर माहिती बघून वेगवेगळ्या पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करतात. इनॉकी मशरूम्सबाबत यंदा गुगलवर सर्वाधिक सर्च झाले. त्यापाठोपाठ आपल्या सर्वांचा आवडता पदार्थ मोदकबाबत सर्वाधिक सर्च करण्यात आले.

  • इनॉकी मशरूम्स

  • मोदक

  • कुकीज

  • पालक

  • चिकन सूप

6) न्यूज सर्च

जागतिक घडामोडींबाबत भारतात करण्यात आलेल्या गुगल न्यूज सर्चमध्ये टोक्यो ऑलिम्पिक, ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस), अफगाणिस्तानातील तालिबान्यांनी केलेल्या हिंसाचाराबाबत तसेच पश्चिम बंगाल निवडणुकीबाबतही सर्वाधिक सर्च करण्यात आले.

  • टोक्यो ऑलिंपिक

  • ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस)

  • अफगाणिस्तान

  • प. बंगाल निवडणूक

  • तौक्ते चक्रीवादळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com