बंदी असलेला कंटेंट न हटवल्यानं गूगलला दंड

google
googlegoogle
Summary

रशियाने ऑक्टोबरमध्ये त्यांचे सर्च इंजिन आणि युट्यूबवरून बंदी असलेला कंटेटं हटवण्यात अपयश आल्यानं गूगलला दंड ठोठावण्याचा इशारा दिला होता.

मॉस्को - बंदी असलेला कंटेंट हटवण्यासंदर्भात अंमलबजावणी न केल्यानं मॉस्कोतील एका न्यायालयाने मंगळवारी अल्फाबेट इंक, गूगलवर ३ मिलियन रुबल म्हणजेच जवळपास ४० हजार ४०० डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. भारतीय चलनानुसार हा दंड जवळपास ३० लाख रुपये इतका होतो. रशियाने ऑक्टोबरमध्ये त्यांचे सर्च इंजिन आणि युट्यूबवरून बंदी असलेला कंटेटं हटवण्यात अपयश आल्यानं गूगलला दंड ठोठावण्याचा इशारा दिला होता. रशियात होणाऱ्या वार्षिक उलाढालीच्या एक टक्के दंड रशियाला करण्यात आला आहे. परदेशी तंत्रज्ञान कंपन्यांवर लावण्यात आलेल्या या दंडामुळे मॉस्कोने सर्वात मोठं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.

गूगलने गेल्या महिन्यात अशाच एका प्रकरणात रशियाच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णय़ानंतर दंड म्हणून ३२ मिलियनहून अधिक रुबल दिले होते. न्यायालयाने दंड ठोठावल्याबाबत अद्याप तरी कंपनीने काही माहिती दिलेली नाही. रशियाने या वर्षभरात अनेक अमेरिकन टेक कंपन्यांना दंड केला आहे. मार्चपासून ट्विटरवर बंदीची कारवाई केली आहे. रॉयटर्सने म्हटलं होतं की, जोपर्यंत सर्व अवैध कंटेंट काढून टाकण्यात येत नाही तोपर्यंत मोबाईल उपकरणांमध्ये असलेली बंदी हटवली जाणार नाही.

याआधी ऑगस्टमध्ये मॉस्कोतील एका न्यायालयाने रशियातील बंदी असणाऱ्या कंटेंटच्या नियमांचे उल्लंघन केल्यानं गूगलला ४० लाख रुपयांचा दंड केला होता. तर ट्विटरला तब्बल ९ कोटी रुपये दंड भरावा लागला होता. ट्विटरविरोधात सहा प्रकरणांमध्ये हा दंड करण्यात आला होता.

google
‘ओमिक्रॉन’पासून मोठा धोका शक्य; WHO

सप्टेंबर महिन्यात रशियाने इंटरनेटवर चाप लावण्याच्या दिशेने अनेक हालचाली केल्या आहेत. परदेशी कंपन्यांना देशात पूर्णवेळ कार्यालय सुरु करणं बंधनकारक केलं होतं. तसंच असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की, कंपन्यांना त्यांच्याच देशात रशियन नागरिकांकडून संबंधित डेटा सेव्ह करावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com