esakal | "व्हर्च्युअल गेमिंग'चा ट्रेंड 
sakal

बोलून बातमी शोधा

"व्हर्च्युअल गेमिंग'चा ट्रेंड 

"व्हर्च्युअल गेमिंग'चा ट्रेंड 

sakal_logo
By
सलील उरुणकर

शहरामध्ये मोकळी मैदाने शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे मुले-मुली फक्त मोबाईल किंवा कम्प्युटरवरच खेळत बसलेली असतात, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. त्यात काही प्रमाणात तथ्य आहेसुद्धा; पण आता जर मलिंगा, ब्रेट ली, वासिम अक्रम, शेन वॉर्न किंवा अनिल कुंबळे अशा दिग्गज गोलंदाजांच्या समोर तुम्हाला बॅटिंग करता येईल किंवा "ज्युरॅसिक एस्केप'सारखा साहसी खेळ खेळल्यासारखे "फिल' एका जागेवरूनच घेता येईल, असे सांगितले तर खरं वाटेल का? कदाचित वाटणार नाही; पण तशी सोय आता शहरात उपलब्ध झाली आहे. "व्हर्च्युअल गेमिंग' ही संकल्पना आता लोकप्रिय होऊ लागली आहे. 

तब्बल 35 हजार चौरस फूट एवढ्या जागेवर विस्तारलेल्या "लार्ज फॉरमॅट डिजिटल एंटरटेन्मेंट पार्क'मध्ये अशाप्रकारचे "व्हर्च्युअल गेमिंग' अनुभवण्याची सोय झाली आहे. फक्त खेळण्यापुरतेच या फॉरमॅटचे फायदे मर्यादित आहेत असे नाही. ऍक्रोफोबिया म्हणजे उंचीविषयी वाटणारे भयसुद्धा तुम्हाला कमी करता येईल. म्हणजे प्रत्यक्ष कोठेही उंचावर न जाता मात्र तेथे गेल्याचा अनुभव घेण्याची सोय अशा फॉरमॅट्‌समध्ये आहे. त्यामुळे अशाप्रकारचा त्रास होणाऱ्या आणि तो घालविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकांसाठी हा फोबिया घालविण्याचा चांगला मार्ग असू शकतो. 

"360 डिग्री क्रिकेट सिम्युलेटर'च्या साह्याने हे शक्‍य झाले आहे. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष बॉल मारता; पण तो बॉल टाकणारा गोलंदाज हा व्हर्च्युअल म्हणजे आभासी असतो. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावर पडणाऱ्या "लेंथ अँड स्पीड'ने बॉल येतो आणि तुम्ही त्याला खेळायचे असते. याव्यतिरिक्त अनोखे ट्‌वायलाइट बोलिंग झोन, ग्रुप गेम्ससाठी असलेल्या लेझर ब्लास्ट, काही रंजक आर्केड व रिडमशन गेम्सचा समावेशही या गेमिंग झोनमध्ये आहे. ट्‌वायलाइट बोलिंगमध्ये "अल्ट्राव्हायोलेट लाइट'ने सजलेल्या बोलिंग लेन्समुळे तुम्हाला या खेळाचा वेगळाच अनुभव मिळतो; तसेच फिंगर कोस्टर आणि ज्युरॅसिक एस्केपसारख्या अत्याधुनिक व्हर्च्युअल रिऍलिटी गेम्सचा आनंदही या लार्ज डिजिटल फॉरमॅटमध्ये अधिक मिळतो. "गेमिंग इंडस्ट्री'मध्ये ग्राहकांना खेळण्याचा उत्कृष्ट अनुभव देण्याची स्पर्धा सुरू आहे. लार्ज फॉरमॅट व्हर्च्युअल गेमिंग हा त्यातलाच नवा ट्रेंड आहे. 

loading image