Samsung Galaxy Unpacked 2024 : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सॅमसंगचा धमाका! 'अनपॅक्ड' इव्हेंटची घोषणा

Samsung 2024 Event : सॅमसंगने आपल्या एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत या इव्हेंटची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये 'गॅलेक्सी एआय इज कमिंग' असं सांगण्यात आलं आहे.
Samsung Galaxy Unpacked 2024
Samsung Galaxy Unpacked 2024eSakal

Samsung Galaxy Unpacked 2024 Event : दरवर्षी जानेवारी महिन्यात सॅमसंग कंपनी आपला वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट आयोजित करते. सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड असं या इव्हेंटचं नाव आहे. यावर्षी 17 जानेवारी रोजी हा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कंपनी विविध प्रोडक्ट्सची घोषणा करणार आहे.

सॅमसंगने आपल्या एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत या इव्हेंटची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये 'गॅलेक्सी एआय इज कमिंग' (Galaxy AI) असं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच यावर्षीच्या इव्हेंटची थीम ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असू शकते.

या मेगा इव्हेंटमध्ये (Samsung Event 2024) विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स लाँच केले जातील. यामध्ये Samsung Galaxy S24 सीरीजचा समावेश असल्याचं आतापर्यंतच्या रिपोर्ट्समध्ये समोर आलं आहे. या सीरीजमध्ये नवे एआय फीचर्स देखील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबत इतर प्रॉडक्टची घोषणाही होऊ शकते.

कुठे पाहता येणार?

सॅमसंगचा हा इव्हेंट 17 जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल. सॅमसंगची अधिकृत वेबसाईट आणि यूट्यूब चॅनलवर हा इव्हेंट लाईव्ह पाहता येईल. (Where to Watch Samsung Galaxy Unpacked Event)

या इव्हेंटसाठी यूजर्स प्री-बुकिंगही करू शकतात. 1,999 रुपये देऊन प्री-बुकिंग केल्यास यूजर्सना नवीन प्रॉडक्ट्सवर 5,000 रुपयांपर्यंतची सूट आणि प्राधान्याने डिलिव्हरी या सुविधा देण्यात येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com