चेष्टा नाही! सॅमसंग घेऊन येतोय तब्बल 600 मेगापिक्सलचा मोबाईल कॅमेरा  

Samsung Camera Mobile.jpg
Samsung Camera Mobile.jpg

गेल्या काही दशकात मोबाईल मध्ये झालेल्या क्रांतीमुळे संपूर्ण जग बदलून गेले आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान मोबाईलच्या दुनियेत येत असून, आता यातील अग्रेसर सॅमसंग तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला मोबाईल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. मोबाईल तंत्रज्ञानाबाबत लक्ष ठेवून असलेल्या टिपस्टर आइस युनिव्हर्सने याबाबतची माहिती उघड केली आहे. 

टिपस्टर आइस युनिव्हर्सने याबाबतची एक स्लाईड उघड केली असून, सॅमसंग ब्रँडने आपल्या मोबाईलमध्ये तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे म्हटले आहे. शिवाय या स्लाईडमध्ये गेल्या काही वर्षांपासून 4 के आणि 8 के व्हिडिओ वाढत्या प्रमाणात मुख्य प्रवाहात येत असल्याचे लक्षात घेऊन हाय रिझोल्यूशन कॅमेरा सेन्सर देण्याची योजना आखली असल्याचे टिपस्टर आइस युनिव्हर्सने सांगितले आहे. तसेच कॅमेरा बम्पच्या समस्येच्या निराकरणासाठी सॅमसंग आयसोसेल देखील हवे असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर जीएसएम एरिनाने आपल्या अहवालात एक किंवा त्याहून कमी 0.57 इंच सेन्सर कॅमेराच्या मागील बाजूला असलेल्या पॅनेलची 12% जागा व्यापणार असल्याचे म्हटले आहे. 

याव्यतिरिक्त, मागील काही वर्षांमध्ये कॅमेरामधील सेन्सर तंत्रज्ञान हे मोठे आणि अधिक विकसित झाले असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. सध्याच्या घडीला 48-मेगापिक्सल, 64-मेगापिक्सल, आणि 108-मेगापिक्सल कॅमेरा असलेले मोबाईल बाजारातील मुख्य प्रवाहात आहेत. त्यानंतर आतापर्यंत मोबाईल मधील सोनी या ब्रँडकडे कॅमेराच्या सेन्सर मधील आयएमएक्स लाईन तंत्रज्ञान आहे. तर सॅमसंग यासाठी स्वतःची आयसोसेल तंत्रज्ञान सिरीज आणण्याच्या तयारीत आहे. 

आता मोबाईल मधील सगळ्यात जास्त कॅमेरा सेन्सर तंत्रज्ञान आयसोसेल एचएम 2, आयसोसेल एचएम 1 आणि आयसोसेल एचएमएक्स आहेत. यामध्ये आयसोसेल एचएम 2 चा विचार केल्यास, यातील सेन्सर नऊ पिक्सल बिनिंग तंत्रज्ञान आणि स्मार्ट-आयएसओसह सुसज्ज आहे. यात 0.7 यूएम पिक्सल साईज, 1 ऑर1.52 इंच ऑप्टिकल फॉरमॅट आणि 108-मेगापिक्सल रिझोल्यूशन आहे.   

सॅमसंगचे नवीन तंत्रज्ञानातील आयसोसेल प्लस ही  आयसोसेल एचएम 2 पेक्षा अधिक शक्तिशाली आणि विकसित आहे. शिवाय यात वापरण्यात आलेल्या विशेष तंत्रज्ञानामुळे पिक्सल मधील हस्तक्षेप आणि पिक्सल्स भाग वेगळे होण्यास मदत मिळणार आहे. तसेच त्यामुळे फोटोतील रंग आणि प्रकाशाची तीव्रता सुधारणार असून, वास्तविक जीवनातील आकाश स्वच्छ आणि निळेशार दिसणार असल्याचे सॅमसंगने आपल्या वेबसाइटवर स्पष्ट केले आहे.          

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com