येतोय सॅमसंगचा स्वस्त 5G फोन; लॉन्च होण्यापूर्वी पाहा किंमत, फीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samsung galaxy a23 5g price and colour options detail leak ahead of launch check details

येतोय सॅमसंगचा स्वस्त 5G फोन; लॉन्च होण्यापूर्वी पाहा किंमत, फीचर

Samsung Galaxy a23 5g : जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर लवकरच सॅमसंगचा एक मिड-रेंज स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच सॅमसंगच्या आगामी फोनची किंमत समोर आली आहे. हा स्मार्टफोन Samsung Galaxy A23 5G फोन ज्याची किंमत लॉन्च करण्यापूर्वी ऑनलाइन समोर आली आहे.

हँडसेट एका युरोपियन रिटेलरच्या वेबसाइटवर समोर आला असून या ठिकाणी त्या फोनची किंमत उघड केली आहे. लिस्टिंगमधून फोनच्या कलर ऑप्शन्सची माहितीही समोर आली आहे, ज्यामध्ये फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च केला जाईल असे संकेत दिले आहेत. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला भारतात Galaxy A23 4G लॉन्च केला होता, परंतु 5G कधी लॉन्च होईल याबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

सैमसंग गैलेक्सी A23 5G ची किंमत (संभावित)

Gizpie च्या रिपोर्टनुसार, Samsung Galaxy A23 5G अलीकडेच 4GB + 64GB स्टोरेज मॉडेलसाठी EUR 300 (अंदाजे रु 24,000) प्राईस टॅगसह युरोपियन रिटेलर वर लिस्ट करण्यात आलेले आहे. याशिवाय हँडसेट ब्लॅक, लाइट ब्लू आणि व्हाईट कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असू शकतो, अशी माहिती देखील देण्यात आली आहे. तसेच Samsung Galaxy A23 5G हा 4GB + 64GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध असेल, परंतु याक्षणी इतर स्टोरेज व्हेरिएंट्सबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे, Samsung ने अद्याप A23 5G स्मार्टफोनच्या लॉन्च तारीख कन्फर्म केलेली नाही. हे यापूर्वी ब्लूटूथ स्पेशल इंटरेस्ट ग्रुप (SIG) सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसून आला आहे. वेबसाइटने स्मार्टफोनला मॉडेल क्रमांक- SM-A236M, SM-A236B आणि SM-A236E सह विविध व्हेरिएंटमध्ये लिस्ट केला आहे.

हेही वाचा: Jio Vs Vi : तुमच्यासाठी 399 रुपयांचा कोणता पोस्टपेड प्लॅन आहे बेस्ट?

Samsung Galaxy A23 5G स्पेक्स (अपेक्षित)

गेल्या महिन्यात, Samsung Galaxy A23 5G देखील मॉडेल क्रमांक "SM-A236U" सह गीकबेंच लिस्टींगमध्ये दिसला होता. यावरून स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 695 द्वारे समर्थित असेल ऑक्टा-कोर चिपसेटसह आणि अॅड्रेनो 619 GPU सह येईल असे आढळून आले आहे . शिवाय, असेही म्हटले होते की Samsung Galaxy A23 5G आउट-ऑफ-द-बॉक्स Android 12 वर चालेले. जो OneUI 4.1 स्किनवर आधारित असण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy A23 5G मध्ये क्वाड रीअर कॅमेरा युनिट असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, एक 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आणि दोन 2-मेगापिक्सेल मॅक्रो आणि डेप्थ सेन्सर समाविष्ट आहेत.फ्रंट कॅमेर्‍यासाठी, यामध्ये 13-मेगापिक्सेल सेन्सर असल्याचे सांगितले जाते. सॅमसंगने हँडसेटला 5000mAh ची बॅटरी देखील देण्याची अपेक्षा आहे, ज्यावा मार्चमध्ये भारतात लॉन्च झालेल्या Galaxy A23 4G ची 5G आवृत्ती असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Hero ची आणखी एक परवडणारी बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत, फीचर्स

Web Title: Samsung Galaxy A23 5g Price And Colour Options Detail Leak Ahead Of Launch Check Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TechnologySamsung