सॅमसंगचा Galaxy A53 5G फोन भारतात लॉन्च; प्री-बुकिंगवर मिळतेय ऑफर

samsung galaxy a53 5g launched in india with 64mp ois camera check all details
samsung galaxy a53 5g launched in india with 64mp ois camera check all details

सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन Galaxy A53 भारतात लॉन्च झाला आहे. हा फोन 64MP OIS कॅमेरा तसेच 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5nm आधारित Exynos 1280 प्रोसेसर सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. Samsung Galaxy A53 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकाना अनेक उत्तम ऑफर देत आहे. आज, 21 मार्चपासून या फोनचे प्री-बुकिंग करता येईल.

Samsung India ने Galaxy A सीरीज अंतर्गत Samsung Galaxy A53 5G भारतात लॉन्च केला आहे. Samsung Galaxy A53 5G भारतात 64-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह सादर करण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे. याशिवाय Galaxy A53 5G मध्ये 8 GB रॅम आणि 5 नॅनोमीटर प्रोसेसर देण्यात आला आहे. Galaxy A53 5G ला वॉटर रेसिस्टंटसाठी IP67 रेटिंग मिळाले आहे.

Samsung Galaxy A53 5G किंमत आणि ऑफर्स

6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Samsung Galaxy A53 5G ची किंमत 34,499 रुपये आणि 128GB स्टोरेजसह 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे. फोनची विक्री 27 मार्चपासून सुरू होणार असून प्री-बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. Samsung Galaxy A53 5G Osm ब्लॅक, Osm ब्लू, Osm Peach आणि Osm व्हाईट रंगात खरेदी केला जाऊ शकतो. ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 3,000 इन्स्टंट कॅशबॅक उपलब्ध होईल.

samsung galaxy a53 5g launched in india with 64mp ois camera check all details
'आता रेजिमेंटमध्ये आम्हाला जय भीम म्हणता येत नाही'; जवानांची आव्हाडांकडे तक्रार

Samsung Galaxy A53 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A53 5G मध्ये Android 12 आधारित One UI 4.1 देण्यात आला आहे. याशिवाय, यात 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 5nm Exynos 1280 प्रोसेसरसह 8 GB रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज मिळते. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण दिले आहे.

Samsung Galaxy A53 5G कॅमेरा

Samsung Galaxy A53 5G मध्ये चार मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेल आहे. त्याचे अपर्चर f/1.8 आहे. दुसरी लेन्स 12-मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलची आहे, तिसरी लेन्स 5-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे आणि चौथी लेन्स 5-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी सॅमसंगने फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

samsung galaxy a53 5g launched in india with 64mp ois camera check all details
TVS चे आणखी एक स्वस्त स्कूटर लॉंच; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही

Samsung Galaxy A53 5G बॅटरी

Samsung Galaxy A53 5G मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS आणि कनेक्टिव्हिटीसाठी टाइप-सी पोर्ट दिला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे. वॉटर रेसिस्टंटसाठी फोनला IP67 रेटिंग मिळाली आहे. यात 5000mAh बॅटरी असून 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

samsung galaxy a53 5g launched in india with 64mp ois camera check all details
रेडमीचा स्वस्त स्मार्टफोन लॉंच; मिळेल 50MP कॅमेरा, फास्ट चार्जिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com