
Samsung Galaxy M Series Smartphone Launch : सॅमसंग कंपनी आज 27 फेब्रुवारीला आपल्या लोकप्रिय M सिरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन्स Galaxy M16 आणि Galaxy M06 5G भारतीय बाजारात सादर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या फोनबाबत अनेक टीझर्स समोर आले होते, आणि अखेर कंपनीने त्यांच्या अधिकृत लॉन्चची घोषणा केली आहे.
सॅमसंग Galaxy M16 आणि Galaxy M06 5G हे मागील वर्षी लाँच झालेल्या Galaxy M15 आणि M05 चे अपडेटेड व्हर्जन असणार आहेत. या नवीन फोनमध्ये दमदार प्रोसेसर, सुधारित कॅमेरा सेटअप आणि आकर्षक डिझाईन पाहायला मिळणार आहे.
Samsung Galaxy M16-
ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप
पिल-शेप डिझाईन असलेले कॅमेरा मॉड्यूल
LED फ्लॅश कॅमेरा मॉड्यूल
ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप
टॉप-लेफ्ट कोपऱ्यात पिल-शेप कॅमेरा मॉड्यूल
LED फ्लॅश.
Geekbench लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy M06 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 SoC प्रोसेसर आणि 8GB RAM असणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्स Android 14 वर आधारित One UI 6 वर चालणार आहेत.
ही नवीन M सिरीज 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता Amazon India वर अधिकृतपणे लाँच झाली. अमेझॉनच्या लँडिंग पेजवर या स्मार्टफोन्सचा डिझाईन टीझर आधीच समोर आला आहे.
Samsung Galaxy M16 आणि M06 5G चे अधिकृत स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि विक्रीबाबतची माहिती लाँच इव्हेंटमध्ये समोर येईल. भारतीय ग्राहकांना बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोनच्या शोधात हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.