Samsung Galaxy S21 FE फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉंच; पाहा किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Galaxy S21 FE 5G

Samsung Galaxy S21 FE फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉंच; पाहा किंमत

दक्षिण कोरियाची कंपनी Samsung ने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S21 FE 5G भारतात लॉन्च केला आहे. या फोनचे भारतीय बाजारात प्री-बुकिंग सुरू झाले आहे. तसेच हा फोन 11 जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Samsung Galaxy S21 FE नुकताच जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला आहे . भारतीय बाजारात Samsung Galaxy S21 FE Exynos 2100 प्रोसेसरसह तो देण्यात आला असून इतर देशांमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S21 FE किंमत

Galaxy S21 FE च्या 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज 49,999 रुपयांना आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटसह 8 GB रॅम 53,999 रुपयांना खरेदी करता येईल. गॅलेक्सी S21 FE ची विक्री सॅमसंग इंडियाच्या ऑनलाइन स्टोअर व्यतिरिक्त Amazon India वर 11 जानेवारीपासून सुरू होईल. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 'Next Galaxy VIP Pass' मिळेल ज्याच्या मदतीने वापरकर्ते Galaxy SmartTag फ्री मिळवू शकतील. त्याची किंमत 2,699 रुपये आहे.

स्पेसिफिकेशन्स

Galaxy S21 FE 5G मध्ये Android 12 आधारित One UI 4 देण्यात आले आहे. याशिवाय, यात 6.4-इंचाचा फुल एचडी प्लस डायनॅमिक एमोलेड 2x डिस्प्ले 5 आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये 8 GB पर्यंत RAM सह 256 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. यात स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आहे.

हेही वाचा: Jio एक वर्षाचा प्रीपेड प्लॅन; दररोज मिळेल 2.5GB डेटा आणि बरंच काही

कॅमेरा

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर सॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्याचा पहिली लेन्स 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आहे. तर दुसरी लेन्स 12 मेगापिक्सेल वाइड अँगलची आहे आणि तिसरी लेन्स 8 मेगापिक्सल्सची टेलीफोटो लेन्स आहे ज्यामध्ये 30x ऑप्टिकल झूम उपलब्ध असेल. सेल्फीसाठी फ्रंटला 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

बॅटरी

या सॅमसंग फोनला 25W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्टसह 4500mAh बॅटरी दिली आहे. यामध्ये वायरलेस पॉवरशेअर देखील येते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, Samsung Pay, NFC, फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहेत. वॉटर रेसिस्टंटसाठी फोनला IP68 रेटिंग मिळाली आहे.

हेही वाचा: तुम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लसीसाठी पात्र आहात का? येथे जाणून घ्या नियम

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TechnologySamsung
loading image
go to top