Samsung Galaxy S22 ची किंमत लीक; तुमच्या बजेटमध्ये असेल का? वाचा

Samsung Galaxy S22
Samsung Galaxy S22

Samsung Galaxy S22 सीरीज 9 फेब्रुवारी रोजी Galaxy Unpacked 2022 इव्हेंटदरम्यान लॉन्च केली जाईल. या फोनबाबत अनेक लीक्स समोर येत आहेत. अलीकडेच एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे ज्यामध्ये फोनची किंमत सांगितली आहे. Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra या सीरीज अंतर्गत लॉन्च होऊ शकतात. या सीरीजसाठी प्री ऑर्डर सुरू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

याशिवाय Samsung Galaxy Tab S8 लाइनअप देखील लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये Galaxy Tab S8, Galaxy Tab S8 Plus आणि Galaxy Tab S8 Ultra यांचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. लेटेस्ट लीक्सनुसार, Samsung Galaxy S22 सीरीज आणि Samsung Galaxy Tab S8 लाइनअपच्या किंमती उघड झाल्या आहेत.

Samsung Galaxy S22 सीरीजची अपेक्षित किंमत :

Tipster Anthony (@TheGalox_) ने US मधील Samsung Galaxy S22 सीरीजच्या स्मार्टफोन्सच्या कथित किमती ट्विटर पोस्टद्वारे लीक केल्या आहेत. लीकनुसार, व्हॅनिला Samsung Galaxy S22 ची किंमत $799 म्हणजेच जवळपास 59,800 रुपये असू शकते. त्याच वेळी, Samsung Galaxy S22+ ची किंमत $999 म्हणजेच सुमारे 74,800 रुपये असेल. याशिवाय, टॉप-ऑफ-द-लाइन Samsung Galaxy S22 Ultra ची किंमत US मध्ये $1,199 म्हणजेच जवळपास 89,800 रुपये असू शकते. या फोनच्या किंमती 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या असू शकतात.

Samsung Galaxy S22
रेडमी फोन स्वस्तात खरेदीची संधी, मिळतोय बंपर डिस्काउंट; एकदा पाहाच

Samsung Galaxy Tab S8 सीरीजची संभाव्य किंमत :

टिपस्टरनुसार, Galaxy Tab S8 मॉडेलची किंमत $ 649 म्हणजेच सुमारे 48,600 रुपये असू शकते. या सीरिजच्या टॉप मॉडेलची किंमत $1,099 म्हणजेच सुमारे 82,400 रुपये असू शकते. या किंमती त्याच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी देखील अपेक्षित आहेत. मात्र सॅमसंगकडून याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत, फोन आणि टॅबच्या मूळ किमतीसाठी अधिकृत लॉन्च होण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

Samsung Galaxy S22
रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com