
Upcoming Phone: कन्फर्म! या तारखेला येतोय Samsung चा सर्वात पॉवरफुल फोन, मिळेल 200MP कॅमेरा
Samsung Galaxy S23 Launch Soon: वर्ष २०२३ मध्ये अनेक कंपन्या नवनवीन स्मार्टफोन्सला बाजारात लाँच करणार आहे. पुढील काही महिन्यात शानदार फ्लॅगशिप डिव्हाइसेस पाहायला मिळतील. Samsung देखील लवकरच आपली अपकमिंग फ्लॅगशिप सीरिज Samsung Galaxy S23 ला लाँच करणार आहे.
Samsung Galaxy S23 सीरिजच्या लाँचिंग तारखेबाबत माहिती समोर आली आहे. कंपनी या फ्लॅगशिप सीरिजला १ फेब्रुवारीला लाँच करणार आहे. Samsung Colombia च्या अधिकृत वेबसाइटवर फोनला लिस्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: Smart TV Offer: मस्तच! अवघ्या ८ हजारात खरेदी करा ५० इंच स्मार्ट टीव्ही, बंपर ऑफरचा मिळेल फायदा
लवकरच लाँच होणार सॅमसंगचा पॉवरफुल स्मार्टफोन
Galaxy Unpacked इव्हेंटचे १ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले आहे. याच इव्हेंटमध्ये Samsung Galaxy S23 फ्लॅगशिप सीरिज लाँच होणार आहे. गेल्याकाही दिवसापासून फोनशी संबंधित माहिती समोर येत आहे.
या सीरिज अंतर्गत कंपनी तीन स्मार्टफोन्सला लाँच करू शकते. Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Ultra चे रेंडर देखील समोर आले आहेत. हे फोन्स कॉटन फ्लॉवर, Mistly Lilac, Botanic Green आणि फँटम ब्लॅक रंगात येतील.
फोनमध्ये मिळेल दमदार फीचर्स
Samsung Galaxy S23 मध्ये अनेक शानदार फीचर्स मिळतील. या सीरिजमधील टॉप मॉडेल २०० मेगापिक्सल कॅमेरा सपोर्ट असण्याची शक्यता आहे. तर S23 Plus आणि S23 मध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल.
तिन्ही स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतील. तर काही मार्केटमध्ये फोन्सला Exynos प्रोसेसरसह लाँच केले जाऊ शकते. सीरिजच्या डिझाइनमध्ये फारसे बदल केले जाणार नाहीत.