Samsung चा ५ जी स्मार्टफोन होणार लाँच, ही असतील फिचर्स

पुढील आठवड्यात सॅमसंग इंडिया भारतात नवी ५ जी स्मार्टफोन Samsung Galaxy M52 5 G लाँच करणार आहे.
पुढील आठवड्यात सॅमसंग इंडिया भारतात नवी ५ जी स्मार्टफोन Samsung Galaxy M52 5 G लाँच करणार आहे.

औरंगाबाद : पुढील आठवड्यात सॅमसंग इंडिया (Samsung India) भारतात नवीन '५ जी' स्मार्टफोन Samsung Galaxy M52 5 G लाँच करणार आहे. कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यातच अॅमेझाॅनवर Samsung Galaxy M52 5G चा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार फोन १९ सप्टेंबर रोजी लाँच होणार होता. मात्र आता लाँचिंग तारीख बदलवण्यात आली आहे. नवीन फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या सॅमसंग गॅलक्सी एम ५१ चे अपग्रेडेड व्हर्जन असेल. सॅमसंग इंडियाच्या संकेतस्थळावर आगामी फोनची मायक्रोसाईटही लाईव्ह झाली असून फोनची लाँचिंग २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. Samsung Galaxy M52 5G ची विक्री अॅमेझाॅनवरुन होणार आहे.

किंमत

- Samsung Galaxy M52 5G च्या किंमतीविषयी अधिकृतपणे लाँचिंगच्या दिवशी कळेल. मात्र यापूर्वी आलेल्या एका लीक रिपोर्टनुसार फोनची किंमत ३२ हजार ९०० रुपयांच्या जवळपास असू शकते. ही किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची असेल. काळा, निळा आणि पांढऱ्या रंगात फोन खरेदी करण्याची संधी ग्राहकांना राहू शकेल.

पुढील आठवड्यात सॅमसंग इंडिया भारतात नवी ५ जी स्मार्टफोन Samsung Galaxy M52 5 G लाँच करणार आहे.
'या' सायकल्स बाईकपेक्षा कमी नाहीत,जाणून घ्या फिचर्स अन् किंमती

वैशिष्ट्ये

-Samsung Galaxy M52 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या व्यतिरिक्त पंचहोल डिस्प्लेही असेल. फोनमध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल

- त्यात ६.७ इंचाचे एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकते. त्याचा रिफ्रेश रेट १२० hz असेल. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७७८ जी प्रोसेसर आणि ८ जीबी रॅमबरोबर १२८ जीबीचे स्टोरेज मिळू शकते. लीक रिपोर्टनुसार Samsung Galaxy M52 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असेल. त्यात प्रायमरी लेन्स ६४ मेगापिक्सल राहिल. दुसरा लेन्स १२ मेगापिक्सल आणि तिसरा ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा राहिल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com