Samung च्या टीव्हीवर दीड लाखांचे 2 मोबाईल फ्री; सोबत 15 हजारांची कॅशबॅक ऑफर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

जगातील पहिली अशी टीव्ही सिरीज आहे ज्यामध्ये अल्ट्रा थिन फॉर्म फॅक्टर, 8k पिक्चर क्वालिटी आणि सराउंडिंग साउंड ऑडिओचे कॉम्बिनेशन आहे. 

नवी दिल्ली - सॅमसंगने त्यांच्या काही उत्पादनांवर अनेक ऑफर दिल्या आहेत. कंपनीने नुकतीच 2020 QLED 8K TV सिरीज लाँच केल्याची घोषणा केली होती. जगातील पहिली अशी टीव्ही सिरीज आहे ज्यामध्ये अल्ट्रा थिन फॉर्म फॅक्टर, 8k पिक्चर क्वालिटी आणि सराउंडिंग साउंड ऑडिओचे कॉम्बिनेशन आहे. 65 इंच आणि 85 इंच आकारात ही टीव्ही बाजारात उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या टीव्ही सिरीजमध्ये युजर्सना चांगला अनुभव मिळेल असा दावा करण्यात आला आहे. या अल्ट्रा प्रिमियम टीव्ही खरेदीवर कंपनीकडून कॅशबॅकसह अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत. 

हे वाचा - Realme च्या X3 सीरिजचा भारतातील पहिला ‘सेल’, जाणून घ्या SuperZoom स्मार्टफोनचे जबरदस्त फीचर्स आणि किंमत

सॅमसंग कंपनीने त्यांच्या स्मार्ट टीव्हीच्या रेंजवर धमाकेदार ऑफर देत आहे. QLED 8K टीव्ही खरेदी केल्यास ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी  S20+ चे दोन मोबाइल फ्री देण्यात येतील. एवढंच नाही तर ग्राहकांना 15 हजार रुपयांचे कॅशबॅकही कंपनीकडून देण्यात येणार आहे.

कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी s20+ च्या एका मोबाइलची किंमत 78 हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच दोन्ही मोबाईलची किंमत दीड लाखांहून अधिक होईल. 

हे वाचा - फेसबुकवर तुमचा अवतार पाहिलात का? जाणून घ्या कसं तयार करायचं स्टिकर

अल्ट्रा प्रिमियम टीव्ही रेंजमध्ये 99 टक्क्यांपर्यंत स्क्रीन टु बॉडी रेशो ऑफर केला जात आहे. ज्यामुळे युजर्सना टीव्ही पाहताना जबरदस्त अनुभव मिळेल. हे सर्व टीव्ही इन्फिनिटी स्क्रीनसह मिळतात. उत्कृष्ट साउंड आऊटपुटसाठी टीव्हीमध्ये ऑब्जेक्ट ट्रँकिंग साउंड आणि अॅक्टिव्ह व्हॉइस अॅम्प्लिफायरचा वापर करण्यात आला आहे. स्मार्ट टीव्हीच्या 65 इंची सेटची किंमत 4.99 लाख रुपये तर 85 इंच टीव्हीची किंमत 15 लाख रुपये इतकी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samsung qled 8 k tv series offer 2 mobile free and cash back offer