फेसबुकवर तुमचा अवतार पाहिलात का? जाणून घ्या कसं तयार करायचं स्टिकर

fb avtars
fb avtars

नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक सातत्याने युजर्ससाठी काहीतरी नवीन देत असतं. आताही भारतात नव्या अवतार फीचरने धुमाकूळ घातला आहे. भारतात या फीचरच्या मदतीने अनेक युजर्स त्यांचे स्वत:चे अॅनिमेटेड कॅरेक्टर डिझाइन करत आहेत. या फीचरमधून युजरला त्यांच्या चेहऱ्याचं स्टिकर कमेंट करण्याचं आणि मेसेजमध्ये वापरण्याचा पर्याय मिळतो. फेसबुकने भारतीय युजर्ससाठी या स्टिकर्स आणि अवतारला खास कस्टमाइज केलं आहे. 

फेसबुक अवतार फीचरच्या मदतीने एकदा  युजर्सला त्यांचे कॅरेक्टर डिझाइन करावं लागेल. यानंतर पोस्टमध्ये, प्रोफाइल फोटो किंवा मेसेंजर चॅट विंडोमध्ये तो अवतार शेअर करता येईल. यामध्ये युजर्स त्यांचा फेसबुक अवतार थर्ड पार्टी अॅप्स जसे की स्नॅपचॅट, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही एक्स्पोर्ट करू शकता. प्रत्येक फेसबुक युजरला ते तयार करता येतं. त्यासाठी काही स्टेप्स आहेत. 

  • अवतार स्टीकर तयार करण्याआधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरू किंवा अॅपल अॅप स्टोअरवर जाऊन फेसबुक अपडेट करावं लागेल. 
  • फेसबुक अॅप ओपन केल्यानंतर त्याच्या उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या तीन लाइनच्या हॅमबर्गर ऑप्शनवर टॅप करा.
  • ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करा. तुम्हा see more असा पर्याय दिसेल.
  • See more पर्याय क्लिक केल्यावर  Avatars ब्लूक आयकॉनसह दिसेल तो निवडा. 
  • Avatars पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला अवतार कस्टमाइज करण्याचा पर्याय मिळेल. तिथं चेहऱ्याचा आकार ते हेअरस्टाइल इत्यादी फीचर्स कस्टमाइज करता येतील. 
  • अवतारमध्ये बॉडी शेप आणि कपडेही निवडावी लागतात. त्यानंतर तुम्हाला स्टिकर शेअर करता येतं. 

अॅनिमेटेड अवतार तयार करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक प्रकारचे ऑप्शन मिळतात. यात तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा आकार कसा असावा, तुमचे शरीर, कपडे कसे असावेत हेसुद्धा निवडता येतं. त्याशिवाय तुमचा कलर टोन, हेअरस्टाइल, चश्मा असेल तर त्याचेही वेगवेगळे ऑप्शन यामध्ये देण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com