गॅलेक्सी A51 आणि गॅलेक्सी A71; फोन कुणाच्याही हातात जाऊद्या, प्रायव्हेट डेटा राहील 100 टक्के सुरक्षित

जाहिरात
Friday, 9 October 2020

फोन दुसऱ्याने मागितला किंवा हरवला तर? चिंता नको, कारण सॅमसंगने आपल्या दोन फोनवर आणलंय क्विक स्विच फिचर. वापरण्यास एकदम सोपी सिस्टम, सॅमसंग पे आणि नाविन्यपूर्ण फ्लॅगशिप कॅमेरा वैशिष्ट्यांसह, गॅलेक्सी A 51 आणि गॅलेक्सी A 71 स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. 

 फोन दुसऱ्याने मागितला किंवा हरवला तर? चिंता नको, कारण सॅमसंगने आपल्या दोन फोनवर आणलंय क्विक स्विच फिचर. वापरण्यास एकदम सोपी सिस्टम, सॅमसंग पे आणि नाविन्यपूर्ण फ्लॅगशिप कॅमेरा वैशिष्ट्यांसह, गॅलेक्सी A 51 आणि गॅलेक्सी A 71 स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. 

पार्टनर फिचर, एचटी ब्रँड स्टुडिओ 

हातात स्मार्टफोन नसेल तर आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं नक्कीच वाटतं. कारण या स्मार्टफोनमध्ये आपल्या अनेक पर्सनल गोष्टी असतात. आपले फोटोज, विविध डॉक्युमेंट्स, आपले व्हिडीओ सर्वकाही या स्मार्टफोनमध्येच ठेवलेलं असतं. या सर्व गोष्टींची आपल्याला वेळोवेळी गरज भासते. पण हाच स्मार्टफोन इतरांकडे गेला किंवा कदाचित हरवला, तर आपल्याला घाबरल्यासारखं होतं. कारण सर्व महत्त्वाचा आणि आपला वैयक्तिक डाटा लिक होण्याची भीती असते. तसेच आपण मोबाईलमध्ये चॅट करत असताना किंवा फोटो पाहताना शेजारच्या व्यक्तीला ते दिसत असतील तरीही आपल्याला अवघडल्यासारखं होतं. पण, आता याची चिंता करण्याची गरजच नाही. कारण सॅमसंगच्या A 51 आणि A71 या दोन फोनमध्ये एक नवीन फिचर आलंय. यामुळे तुमचा फोन  दुसऱ्याच्या हातात गेल्यानंतरही तुमची सर्व माहिती सुरक्षित राहील.

कोणीतरी फोटो काढण्यासाठी, गेम खेळायला किंवा अन्य कोणत्या कामासाठी तुम्हाला फोन मागितल्यानंतर कधीतरी आपण मनात नसूनही फोन देतो, आपल्याला अवघडल्यासारखं होतं. त्याचं कारण म्हणजे आपल्या फोनमधील वैयक्तिक डेटा दुसरे बघतील अशी भीती आपल्यामध्ये असते. तुमच्या फोनमध्ये तुमच्या पार्टनरसोबतचा सेल्फी असेल आणि घरातील ज्येष्ठ व्यक्ती फोन पाहत असतील, तर या परिस्थितीत नक्कीच तुम्हाला अवघडल्यासारखं वाटत असेल. पण, या सर्व गोष्टींची चिंता करण्याचं आता कारण नाही.

यापूर्वी अशी प्रायव्हसी कधीच पाहिली नसेल 

हे फिचर म्हणजे Alt Z life. यामुळे आपली सर्व माहिती गोपनीय राहते. तसेच आपल्या वैयक्तीक आयुष्यात कोणी डोकावू पाहत असेल तरी ते शक्य होत नाही. तुम्ही बसमधून किंवा मेट्रोमधून प्रवास करताना मोबाईलमध्ये काही ब्रावझिंग करत असाल आणि शेजारची व्यक्ती डोकावून पाहत असेल तर नक्कीच अवघडल्यासारखं होतं. मात्र, आता घाबरू नका. Quick switch तुमचा डेटा सुरक्षित ठेवेल. Quick switch हे नावाप्रमाणेच अगदी झटपट प्रक्रिया पूर्ण करते. त्यासाठी आपल्या फोनच्या पॉवर बटनवर डबल क्लिक करावे लागेल. यामध्ये खासगी आणि प्रायव्हेट, असे दोन पर्याय मिळतील. त्यानंतर तुम्हाला जो खासगी डेटा हाईड करून ठेवायचा तो ठेवू शकतो. यामध्ये गॅलरी, ब्राऊजर आणि व्हॉट्सअ‌ॅपचा डेटा पण सुरक्षित केला जाऊ शकतो. यामध्ये तुम्ही गॅलरीचे प्रायव्हेट व्हर्जन दुसऱ्याला दाखवू शकता. त्यामुळे तुमचा काही वैयक्तिक डेटा असेल तो सुरक्षित राहील. दुसऱ्याच्या हातात मोबाईल देता देता अगदी सहजपणे तुम्ही हे करू शकता. हे फिचर कसं अक्टीव्हेट करता येईल याबाबतची माहिती खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

राधिका मदन देखील तिच्या बहिणीपासून वाचवण्यासाठी हे फिचर वापरते. ते तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.

गॅलक्सी A51 आणि A71 वरील सुरक्षित फोल्डरमध्ये कंटेट सजेशन वापरून आपला वैयक्तिक डेटा त्या फोल्डरमध्ये मूव्ह करता येतो. हे कंटेट सजेशन 'On Device AI' फिचरमधून येतं. यामुळे आपला वैयक्तिक डेटा सुरक्षित राहतो. दुसऱ्याच्या हातात फोन गेला तरी त्यांना तुमचे वैयक्तिक फोटो, व्हिडिओ पाहता येणार नाही. तसेच ही सर्व प्रोसेस फोनमध्येच होते. त्यामध्ये गुगल ड्राईव्हचा वापर केला जात नाही. अशाप्रकारे तुम्ही सॅमसंग गॅलक्सी A51/A71 वर हे फिचर अक्टीव्हेट करू शकता.

तुमच्यातील फोटोग्राफर जागा होईल 

प्रायव्हसी जपणारे हे दोन फिचरच सॅमसंग गॅलक्सी A51 आणि A71 या दोन्ही स्मार्टफोन विशेष बनवत नाहीत, तर याचा क्वाड-कॅमेरा पण तितकाच चांगला आहे. त्यामुळे अतिशय उच्च दर्जाचे फोटो आपण काढू शकतो. एखाद्या गार्डनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मंद प्रकाश असेल तरी या कॅमेऱ्याने चांगले फोटो निघतील. एका क्लिकमध्येही तुम्हाला चांगला फोटो काढता येईल. त्यासाठी परफेक्ट फ्रेम सेट होईल का? याचीही चिंता करण्याचं कारण नाही. कारण कॅमेरा ते सर्व काही हँडल करतोय. तुमचा मित्र एखादा खेळ खेळत असेल तर कॅमेरा सुरू करा आणि सिंगल टेक सिलेक्ट करा. त्यामध्ये ७ फोटो, ३ व्हिडिओ शूट होतील. यामध्ये GIF आणि स्टायलिश फोटो सुद्धा असतील. याशिवाय नाईट हायपरलॅप, स्मार्ट सेल्फी अँगल, क्विक व्हिडिओ, कस्टम फिल्टर, रेकॉर्डींग करताना कॅमेरा स्विच करणे आणि गॅलरी झूम हे सर्व या फोनमध्ये असेल. तसेच या फिचरसह दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि मोठी स्क्रिन या फोनमध्ये असेल. 

मिड रेंज स्मार्टफोन सेगमेंट 

गॅलक्सी A51 आणि A71 हे दोन्ही स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटने ताब्यात घेतले आहे. या फोनच्या कॅमेऱ्यामुळे तुमच्यामधील एक फोटोग्राफर जागा होईल आणि तुम्ही नक्कीच या फिचरला धन्यवाद द्याल. क्नॉक्स सिक्युरिटीमुळे तुम्हाला तुमचा डेटा लिक होण्याची चिंता नसेल. त्यामुळे  तुम्ही घरी वॉलेट विसरले तरी काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही कुठेही मोबाईल ठेवू शकता. कारण सॅमसंगने तुम्हाला ती सोय उपलब्ध करून दिलीये. 

संशोधनानुसार, २०२० मध्ये गॅलक्सी A51 हा जगातील सर्वाधिक विकणारा अँड्राईड फोन बनलाय. या गजबजलेल्या मार्केटमध्ये नक्कीच ही मोठी  कामगिरी आहे. मोठी स्क्रीन, उत्तम दर्जाचा कॅमेरा आणि दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीसोबत हा स्मार्टफोन ग्राहकांच्या हातात दिला जात आहे.

गॅलक्सी A51 दोन कॉन्फिगरेशन विविध उपलब्ध आहे.  यामध्ये 6GB + 12GB हा २२, ९९९ रुपयाला, तर 8GB + 128GB हे मॉडेल २४, ९९९ रुपये किंमतीत मिळणार आहे. दरम्यान, गॅलक्सी A71 हा स्मार्टफोन  8GB + 128GB हा फोन एकाच कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत २९, ४९९ रुपये आहे. क्विक स्विच आणि कंटेट सजेशन हे दोन नवीन प्रायव्हेसी फिचर या फोनला अधिक आकर्षक बनवतात. तुमच्या माहितीसाठी राधिका मदन ही गॅलक्सी A71 स्मार्टफोन वापरतेय...आता तुमची पाळी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samsung reimagines privacy with the Alt Z Life on the Galaxy A51 and A71