Samsung Smartphone : पहा सॅमसंग गॅलॅक्सी M13 साठी ॲमेझॉनची जबरदस्त ऑफर

जुना स्मार्टफोन Amazon ला रिटर्न केल्यावर 10,800 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काऊंट
Samsung Galaxy M13
Samsung Galaxy M13 esakal

Samsung Smartphone : Samsung Smartphone घ्यायचं म्हटलं की त्यावर तगडा डिस्काऊंट मिळतोच मिळतोच. यामुळे बरेच यूजर्स या डिस्काउंटची वाट पाहत असतात. सध्या सॅमसंगच्या Samsung Galaxy M13 वर डिस्काउंट मिळतोय. पण नेमका हा डिस्काऊंट आहे किती ? तर या फोनवर सध्या भला मोठा डिस्काउंट देणं सुरूय. आणि तेही अमेझॉनवर. त्यामुळे तुमचा फोन विकत घेण्याचा थोडा जरी विचार असेल तर ही माहिती नक्की वाचा, कारण यापेक्षा बेस्ट ऑफरमध्ये हा फोन मिळणं शक्य नाही.

Samsung Galaxy M13
Samsung: नवीन फोन घेताय? सॅमसंग लवकरच घेऊन येतेय तीन दमदार स्मार्टफोन्स; काय असेल खास वाचा

तर Samsung Galaxy M13 (मिडनाईट ब्लू, 4GB, 64GB स्टोरेज) ची MRP 14,999 रुपये आहे. आणि 20% डिस्काउंटनंतर हा फोन मिळू शकतो 11,999 रुपयांमध्ये. शिवाय यावर अनेक बँक ऑफर्स सुरू आहेत. पण जर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन घेतला तर तुम्हाला यावर मोठा डिस्काऊंट मिळू शकतो. जर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर तुम्ही तो Amazon ला परत करू शकता.

Samsung Galaxy M13
Samsung Offer : सॅमसंगचा 5G फोल्डेबल फोन ८१ हजारांनी स्वस्त; ऑफर काहीच तास

तुमचा जुना स्मार्टफोन Amazon ला रिटर्न केल्यावर तुम्हाला 10,800 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळू शकतो. पण एवढा मोठा डिस्काऊंट घेण्यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये असायला हवा. सोबतच तुमच्या जुन्या फोनचं मॉडेल कोणतं आहे यावर पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असणार आहेत.

Samsung Galaxy M13
Samsung Galaxy Buds2 Pro : भारतात किंमत किती असेल? जाणून घ्या ऑफर

त्यामुळे एक्सचेंज ऑफर अंतर्गत डिस्काउंट मिळाला तर तुम्हाला हा फोन फक्त 2 हजारात मिळेल. सॅमसंगच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत या फोनचा समावेश आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे त्याची किंमत खूपच कमी आहे आणि त्यात जे फीचर्स आहे ते इतक्या कमी पैशात मिळत असल्यामुळे हा बेस्ट सेलिंग फोन आहे.

Samsung Galaxy M13
Samsung Galaxy S22 ची किंमत लीक; तुमच्या बजेटमध्ये असेल का? वाचा

तुम्हाला Samsung Galaxy M13 मध्ये 6000mAh लिथियम-आयन बॅटरी मिळते. त्यामुळे बॅटरी बॅकअपबाबत तुम्हाला काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही. या स्मार्टफोनसाठी कंपनी 1 वर्षाची वॉरंटी देत आहे.

Samsung Galaxy M13
Samsung Data Breach : सॅमसंगच्या ग्राहकांची माहिती चोरीला; अलीकडील दुसरी घटना

फोंसोबत ज्या अॅक्सेसरीज देण्यात येणार आहेत त्यावर 6 महिन्यांची वॉरंटी असेल. M13 मध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज आहे. M13 मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप दिलाय. याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. Samsung Galaxy M13 मध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com