Samsung TV Plus भारतात दाखल; आता केबलशिवाय पाहता येणार टिव्ही

Samsung TV Plus भारतात दाखल; आता केबलशिवाय पाहता येणार टिव्ही
Updated on

दक्षिण कोरियाची आघाडीची कंपनी सॅमसंगने भारतात Samsung TV Plus हा टिव्ही लाँच केला आहे. सॅमसंगच्या या स्मार्ट टेलिव्हिजनच्या माध्यमातून आता प्रेक्षकांना मोफत टीव्ही कंटेंट, निवड लाइव्ह चॅनेल्स, ऑन डिमांड व्हिडीओज पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे या टिव्हीसाठी सेटटॉप बॉक्स सारख्या अतिरिक्‍त डिवाईसची गरज भासणार नाही. मात्र, या सेवेचा लाभ घेण्‍यासाठी ग्राहकांकडे सॅमसंग स्‍मार्ट टीव्‍ही (२०१७ पासूनचे मॉडेल) आणि इंटरनेट कनेक्‍शनची आवश्यकता लागणार आहे.

TV Plus  हा ओ ओएस किंवा उच्‍च सॉफ्टवेअर व्‍हर्जन्‍स असलेल्‍या बहुतांश सॅमसंग गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स आणि टॅब्‍लेट डिवाईसेसवरदेखील उपलब्‍ध असेल. गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍ससाठी सर्विसेस एप्रिल २०२१ मध्‍ये सुरू होण्‍याची शक्यता आहे. परंतु, त्यासाठी सॅमसंग गॅलॅक्‍सी स्‍टोअर व गुगल प्‍ले स्‍टोअरमधून TV Plus अॅप डाऊनलोड करता येऊ शकते.

टीव्‍ही प्‍लसच्‍या सादरीकरणासह ग्राहकांना त्‍वरित बातम्‍या, जीवनशैली, तंत्रज्ञान, गेमिंग व विज्ञान, क्रीडा व आऊटडोअर्स, संगीत, चित्रपट व मालिका अशा प्रकारच्‍या शैलींमधील आकर्षक कन्‍टेन्‍ट कोणत्‍याही सबस्क्रिप्‍शनशिवाय पाहता येईल.

''मागील एक वर्षापासून ग्राहक घरामध्‍येच वेळ व्‍यतित करत आहेत. त्‍यांचे टेलिव्हिजन सेट्स व स्‍मार्टफोन्‍स मनोरंजन, तसेच माहितीसाठी त्‍यांच्‍या जीवनाचे महत्त्वपूर्ण भाग बनले आहेत. त्यामुळे आमच्या एक गोष्ट लक्षात आली ग्राहक आता उत्तम मीडिया कन्‍टेन्‍टला अधिक महत्त्व देतात, याच कारणामुळे आम्‍ही भारतामध्‍ये सॅमसंग टीव्‍ही प्‍लस लाँच करण्याचा निर्णय घेतला,'' असे सॅमसंग इंडियाच्‍या सर्विसेसच्‍या संचालक रेश्मा प्रसाद वीरमणी म्‍हणाल्‍या. 

गेल्या १० वर्षांपासून सॅमसंग भारतातील टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीचा ब्रॅण्ड आहे. जवळपास १८ हजार ९०० पासून ते १५ लाख ७९ हजार, ९०० पर्यंत या कंपनीचे स्मार्ट टीव्ही बाजारात उपलब्ध आहेत. भारतातील या लाँचसह सॅमसंग टीव्‍ही प्‍लस आता युएस, कॅनडा, कोरिया, स्वित्‍झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, युके, इटली, फ्रान्‍स, स्‍पेन, ऑस्‍ट्रेलिया, ब्राझील व मेक्सिकोसह १४ देशांमध्‍ये उपलब्‍ध आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com