

जगभरातील कित्येक मोठ्या कंपन्या ड्रायव्हरलेस ऑटोमॅटिक कार तयार करत असताना; अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात ड्रायव्हरलेस बस सुविधा सुरू करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियामध्ये रोबोटॅक्सींना परवानगी मिळाल्यानंतर एकाच आठवड्यात ही बस रस्त्यावर धावू लागली आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमधील ट्रेजर आयलँडवर ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी एका ठराविक मार्गावर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही बस धावेल. ही शटल सुविधा असून, या मार्गावर ही बस दर 20 मिनिटांनी एक अशा फेऱ्या मारेल.
या बसेस इलेक्ट्रिक असून, यामध्ये एका वेळी दहा जण प्रवास करू शकतात. बीप नावाच्या कंपनीने या बसेस तयार केल्या आहेत. सध्या अशा दोन बस तैनात करण्यात आलेल्या असून, एक बस फेरीवर असताना दुसऱ्या बसचं चार्जिंग करण्यात येईल. या बसेसना ड्रायव्हर सीट किंवा स्टिअरिंग व्हील या दोन्ही गोष्टी देण्यात आलेल्या नाहीत. (Technology News)
सॅन फ्रान्सिस्को शहरात अशा प्रकारच्या इतर अनेक ड्रायव्हरलेस वाहनांची चाचणी सुरू आहे. बीप कंपनी ही अमेरिकेत आणखी बऱ्याच ठिकाणी आपल्या बसेसची चाचणी घेणार आहे. सध्या सुरू असलेली चाचणी यशस्वी झाल्यास, याचा मोठ्या स्तरावर वापर सुरू केला जाऊ शकतो.
ऑटोमॅटिक वाहनांचा अपघात होण्याची शक्यता ही कधीच नाकारता येत नाही. त्यामुळेच या बसेसमध्ये एक ऑपरेटर देखील असणार आहे. गरज भासल्यास हा ऑपरेटर रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने बस चालवणार आहे. यामुळे अपघाताची शक्यता टळणार आहे. (Global News)
या बसमधून पहिल्यांदा प्रवास करण्याची संधी मिळालेल्या प्रवाशांनी हा एक विलक्षण अनुभव असल्याचं सांगितलं. या बसमध्ये ड्रायव्हर नसल्याचं आपल्याला जाणवलंच नाही. आपल्याला अगदी सुरक्षितपणे प्रवास करता आला, असं मत प्रवाशांनी व्यक्त केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.