WhatsApp वर करा 'हे' पाच नंबर सेव्ह अन् ऑर्डर-बुकींग होणार सहज | WhatsApp Chatbot | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whatsapp

WhatsApp वर करा 'हे' पाच नंबर सेव्ह अन् ऑर्डर-बुकींग होणार सहज

व्हाट्सॲप हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलाय. या व्हाट्सॲपमुळे सर्व गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला व्हाट्सॲपचे आणखी एक फिचर सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनात याचा फायदा होणार.

व्हाट्सॲपवर तुम्ही जर काही नंबर सेव्ह केले तर तुमचे काम अधिक सुपरफास्ट होणार. या नंबरच्या माध्यमातून तुम्ही वस्तू ऑर्डर करण्यापासून ते प्रवास बुकींगपर्यंतचा फायदा तुम्ही घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया ते नंबर कोणते आहेत.

हेही वाचा: Jalgaon Cyber Crime : ‘Whatsapp’ Chattingद्वारे पोलिसांची बदनामी पडली महागात

JioMart चॅटबॉट (7977079770)

7977079770 हा नंबर जर तुम्ही तुमच्या व्हाट्सॲपवर सेव्ह केला तर कोणत्याही घरगुती वस्तुंची तुम्ही सहज ऑर्डर देऊ शकता. हा नंबर वर सेव्ह केल्यानंतर तुम्ही चॅटबॉटवर जा आणि Hi असा मेसेज करा त्यानंतर तुम्ही कॅटलॉगमधील कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही ऑनलाईन पेमेंटही करू शकता.

IRCTC चॅटबॉट (7042062070)

IRCTC चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही ट्रेनमध्ये फुड ऑर्डर करू शकता. त्यासाठी तुम्हाला 7042062070 नंबर सेव्ह करावा लागेल. या नंबरवर Hi पाठवा. यानंतर तुम्हाला PNR नंबर टाकून स्टेशन सिलेक्ट करावं लागेत अशाप्रकारे तुम्हाला ट्रेनमध्ये जेवण बुक करता येणार.

हेही वाचा: WhatsApp : कोणालाही तुमचा नंबर दिसू न देता व्हॉट्सअॅप वापरा

Uber चॅटबॉट (7292000002)

7292000002 हा नंबर जर तुम्ही व्हाट्सॲपवर सेव्ह केला तर Uber चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही कॅब बुक करू शकता. या साठी Uber चॅटबॉटवर Hi नंबरवर पाठवा आणि तुमचा Uber ID अन् password टाकून लॉग इन करा. त्यानंतर तुम्ही जर पिकअप आणि ड्रॉप लोकेशन टाकले तर तुम्हाला ड्रायव्हरची माहीती मिळणार.

Period ट्रॅकर चॅटबॉट (9718866644)

जर तुम्हाला पीरीअडची तारीख विसरायची सवय असेल तर तुमच्या व्हाट्सॲपवर 9718866644 हा नंबर सेव्ह असायला पाहीजे कारण हा नंबर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीची डेट तुम्हाला आठवण करुन देणार. यासाठी या चॅटबॉट वर hi पाठवावा लागेल.

फ्लाईट बुकींग चॅटबॉट (9154195505, 7428081281)

जर तुम्हाला व्हाट्सॲपवरुन फ्लाईट बुक करायची असेल तर तुमच्या व्हाट्सॲपवर 9154195505 किंवा 7428081281 हे नंबर सेव्ह करावे. त्यासाठी फ्लाईट बुकींग चॅटबॉटवर जावं Indigo साठी 7428081281 आणि Air India साठी 9154195505 या नंबर वर जावं. या नंबरवरुन तुम्ही flight status, web check किंवा थेट फ्लाईट बुक करू शकता.