esakal | भारीच! शरीरातील उर्जेच्या सहाय्याने मोबाईल आणि वॉच होणार चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

strip

सॅन डियागोतील कॅलिफॉर्निया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी एक भन्नाट शोध लावला आहे. त्यांनी एक स्ट्रिप तयार केली असून मानवी उर्जेचा वापर करुन मोबाईल फोन किंवा आपली वॉच चार्ज करणे शक्य होणार आहे.

भारीच! शरीरातील उर्जेच्या सहाय्याने मोबाईल आणि वॉच होणार चार्ज

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सॅन डियागोतील कॅलिफॉर्निया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी एक भन्नाट शोध लावला आहे. त्यांनी एक स्ट्रिप तयार केली असून मानवी उर्जेचा वापर करुन मोबाईल फोन किंवा आपली वॉच चार्ज करणे शक्य होणार आहे. या संशोधनात भाग घेणाऱ्या वैज्ञानिकांनी दावा केलाय की, झोपेमध्ये असताना सुद्धा ही स्ट्रिप चार्ज होत राहणार आहे. तुम्ही 10 तास झोप घेतली असेल तर याच्या मदतीने तुम्ही तुमची वॉच 24 तास चालवू शकता. (Scientists develop strip capable of charging smartphones and watches with human energy)

शरीराच्या शक्तीच्या वापर करुन उर्जा निर्माण करणारे अनेक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. पण, यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात शरीराची हालचाल करावी लागते किंवा सूर्य प्रकाश, तापमान बदलाच्या मदतीने उपकरण चार्ज करावे लागते. पण, वैज्ञानिकांनी तयार केलेली हे उपकरण तुम्ही झोपेत असताना सुद्धा चार्ज होत राहणार आहे. हे उपकरण क्रांतीकारक ठरण्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

हेही वाचा: 'खायला अन्न नाही, मदत करा'; हुकूमशहा किम जोंग उन झाले हतबल

स्ट्रिप आपल्या हातांच्या बोटावर लावली जाते. ही स्ट्रिप शरीरातील घामाच्या सहाय्याने उर्जा निर्माण करते. या स्ट्रिपला चार्ज करण्यासाठी तुम्हाला व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करण्याची आवश्यकता नाही. उर्जा निर्माण करण्यासाठी ही स्ट्रिप सर्वसामान्य लोकांसाठी फायद्याची ठरु शकते, असं वैज्ञानिकांचे म्हणणं आहे.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

हातातील बोटांच्या मदतीने ही स्ट्रिप उर्जा निर्माण करते. स्ट्रिपमध्ये कार्बनने बनलेले इलेक्ट्रिक कंडक्टर असताना जे शरीरातील घाम शोषून घेतात. इलेक्ट्रोडवर असणारे एन्झाईम्समुळे घामाचे रेणू आणि ऑक्सिजनमध्ये केमिकल रिअॅक्शन होते. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. या उर्जेचा वापर करुन मोबाईल फोन किंवा घड्याळ चार्ज करता येते. वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार, शरीरातील इतर भाग थेट हवेशी संपर्कात येत नसतात. पण, हातांचे बोटे कायम ऑक्सिजनच्या संपर्कात असतात. त्यामुळे याठिकाणी घाम आल्यास लगेच याचे बाष्पीभवन होते. घामाचे बाष्पीभवन होऊ न देता, स्ट्रिप या घामाचा वापर करते आणि याच्या माध्यमातून उर्जा निर्माण केली जाते.

loading image