
एलियनसारखी संकल्पना आपण चित्रपटात पाहतो
पण खरोखर एलियन सिग्नल मिळाला तर?
अशीच एक घटना घडली असून, शास्त्रज्ञांनी मोठा खुलासा केलाय
'कोई मिल गया' सारखा चित्रपट पाहून आपल्या मनातबद्दल खूप कुतूहल निर्माण होते. जादूचे यान, त्याने पाठवलेला सिग्नल सगळकाही खूप भारी वाटत. पण अशी घटना खरोखर घडली तर?
शास्त्रज्ञांना अंतराळातून आलेला एक अतिशय शक्तिशाली रेडिओ सिग्नल सापडला आहे. याला ‘आरबीफ्लोट’ (Radio Brightest Flash of All Time) असे नाव दिले गेले आहे. हा सिग्नल फक्त काही मिलिसेकंद म्हणजे काही क्षणच दिसला पण तो एवढा ताकदवान होता की आपल्या आकाशगंगेतील इतर सगळ्या रेडिओ लहरींपेक्षा जास्त शक्तिशाली होता. हा सिग्नल पृथ्वीपासून सुमारे १३ कोटी प्रकाशवर्ष दूर असलेल्या ‘अर्सा मेजर’ नावाच्या तारकासमूहातील एका आकाशगंगेपासून आला आहे.