share market
share marketesakal

जाणून घ्या,काय आहे ट्रेडिंग आणि गुंतवणूक यामधला फरक

ट्रेडिंग आणि गुंतवणूकला लोक एकसारखे समजून घेतात

ट्रेडिंग आणि गुंतवणूक हे दोन्ही सारखेच आहेत का ? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो ,तर काही लोक याला एकसारखे समजून घेतात पण हे चुकीचे आहे .ट्रेडिंग आणि गुंतवणूक यामध्ये खूप फरक आहे. चला तर मग आपण जाणून घेऊ यातला नेमका फरक काय आहे.

ट्रेडिंग

ट्रेडिंगमध्ये शेअर्सची देवाणघेवाण ही काही मिनीटांपासून ते १ महिन्यांकरिता होत असते.ट्रेडिंगचा वापर चांगले विश्लेषण करुन पटकन पैसे कमवण्याकरिता केला जातो .इंट्राडे ट्रेडिंग हा ट्रेडिंग करण्याचा प्रसिद्ध प्रकार आहे. आजकाल अनेक जण इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत

उदाहरण -

समजा तुम्ही महिंद्रासारख्या कंपणीचा शेअर ३५० रुपयांना १ शेअर ०९: ३० ला विकत घेतला आणि मार्केट बंद होण्याआगोदर म्हणजेच ०३ :३० च्या आधी ४०० रुपयांना विकुन टाकला म्हणजेच आपल्याला ५० रुपये एक शेअर मागे नफा झाला .सोप्या भाषेत आजच विकत घेतलेला शेअर आजच विकुन टाकने .

गुंतवणूक

गुंतवणूक मध्ये शेअर्स हे एका वर्षाहून अधिक कालावधिकरिता होल्ड केले जातात .तसे पाहता गुंतवणूक ही ५ ते ७ वर्षा करिता करायला हवी ,शक्य होईल तर एका वर्षापेक्षा जास्त होल्ड करावे .सुप्रसिद्ध गुतंवणूकदार सर वॉरन बफे यांनी २० वर्षा आधी विकत घेतलेले शेअर आजही होल्ड केले आहेत .शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक करण्याकरीता एका डिमॅट अकाउंटची गरज असते हे डिमॅट अकाउंट आत्ता आपण घरबसल्या मोफत काढू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com