Short Circuit : या चुका घरात शॉर्ट सर्किटला कारणीभूत ठरू शकतात, अशी बाळगा सावधगिरी

थोडा निष्काळजीपणा शॉट सर्किटचं कारण ठरू शकतं. तेव्हा सावधगिरी बाळगली पाहिजे
Short Circuit
Short Circuit esakal

Short Circuit : घरात वापरली जाणारी उपकरणे जसे की फ्रीज, एसी, टीव्ही, मायक्रोवेव, लाइट, फॅन इलेक्ट्रिसीटीवर चालतात. तुमचा रोजच्या वापरातला फोनसुद्धा चार्जिंग न केल्यास डेड होतो. अर्थात आपले घर विविध उपकरणांच्या माध्यमातून विजेने घेरलेले असते. मात्र विजेचा जेवढा आपल्याला फायदा आहे तेवढंच नुकसान देखील होऊ शकतं. थोडा निष्काळजीपणा शॉट सर्किटचं कारण ठरू शकतं. तेव्हा सावधगिरी बाळगली पाहिजे.

इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट कसा होतो?

घरात विजपुरवठ्यासाठी अनेक तार एकत्र जोडली जातात. जे मेन इलेक्ट्रिक कंट्रोल बोर्डपासून करंटला सगळ्या स्विचेसपर्यंत पोहोचवते. अशात जेव्हा हाय पॉवरवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर केला जातो तेव्हा विजेचा फ्लो गडबडतो आणि तारांमध्ये शॉर्ट सर्किट होतो.

Short Circuit
Electricity Arrears : पुणे परिमंडळात वीजग्राहकांकडे १३३ कोटींची थकबाकी

या कारणांनी होऊ शकतो शॉर्ट सर्किट

  • किडे किंवा अन्य कुठल्या कारणाने किटच्या आतील तार डॅमेज झाल्यास

  • विजेच्या तारांचा संपर्क पाणी किंवा अन्य द्रव्य पदार्थांची आल्याने

  • उघड्या तारांचे एकमेकांना चिपकणे

  • स्विच, लाइट जुने असल्यास किंवा डॅमेज झाल्यास

  • तारांनी विजेवर लोड आल्यास (Electricity)

Short Circuit
Electricity Saving : वर्षाकाठी साडेचार लाखांची वीजबचत

या चुका घरातील शॉर्ट सर्किटला कारणीभूत ठरतात

  • एकाच सॉकेटवर मल्टी प्लगचा वापर करणे

  • वायरिंगसाठी जुन्या वायर्सचा वापर

  • कटलेल्या किंवा डॅमेज वायर्सकडे दुर्लक्ष करणे

  • अशा जागी स्विच बोर्ड लावणे जिथे पाणी जाण्याची शक्यता असते

  • हाय पॉवर इलेक्ट्रिक स्विचसारख्या उपकरणांसाठी नॉर्मल स्विच वापरणे

  • शॉर्ट सर्किटपासून वाचण्यासाठी करा हे उपाय

  • शॉर्ट सर्किटपासून बचाव करण्यासाठी हाय पॉवरच्या उपकरणांसाठी वेगला स्विच बोर्ड लावा.

  • घरून निघताना सगळे स्विच बंद करा.

  • याशिवाय घरात वायरिंगसाठी चांगल्या कॉलिटीच्या वायर्सचा वापर करा.

  • तार डॅमेज असल्यास लगेच बदला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com