Short Circuit : शॉर्ट सर्किट कसे होते ते टाळण्यासाठी काय करावं?

रात्री किंवा दिवसा कोणत्याही वेळी शॉर्ट सर्किट होऊ शकते
Short  Circuit
Short Circuit esakal

Short Circuit : शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी इलेक्ट्रिक उपकरण वापरल्यानंतर प्लगमधून सॉकेट अनप्लग करा. इलेक्ट्रिक उपकरण वापरल्यानंतर शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी प्लगमधून सॉकेट काढून टाका. शॉर्टसर्किट टाळण्यासाठी घरात चांगल्या प्रतीची वायर वापरावी, तसेच घरात चांगल्या कंपनीचे प्लग आणि सॉकेट्स असावेत.

पावसाळ्यात शॉर्ट सर्किट होण्याचे प्रमाण जास्त असते. वाऱ्यामुळे वायर तुटतात. आणि पाऊस पडल्याने पाण्यात करंट उतरतो. त्यामूळे अनेकांचा जीव जाण्याचा धोका असतो. पावसाळ्यात अशा अपघातांचे प्रमाण अधिक असते.

घरात, ऑफिसमध्ये किंवा दुकानात कधीतरी तुमच्यासमोर शॉर्ट सर्किट झाले असेल. रात्री किंवा दिवसा कोणत्याही वेळी शॉर्ट सर्किट होऊ शकते. दिवसा घडल्यास त्याची माहिती तुम्हाला सहज मिळू शकते. (Short Circuit : What is a short circuit how to prevent short circuit)

परंतु रात्रीच्या वेळी शॉर्ट सर्किट झाल्यास तुमच्या घरात व कार्यालयात मोठी आग लागू शकते आणि लाखोंची मालमत्ता जळून खाक होऊ शकते.

Short  Circuit
Mens Short Kurta Fashion : तरूणांनो तीच स्टाइल करून कंटाळलात? शर्ट्समध्ये आलाय हा नवा ट्रेंड

शॉर्ट सर्किट दुरुस्त करण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलवावे लागेल. त्याचबरोबर शॉर्टसर्किटमुळे तुम्हाला तासनतास विजेशिवाय राहावे लागले असेल. तुमच्या घरात पुन्हा शॉर्ट सर्किट होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही बातमी पूर्ण वाचा.

शॉर्ट सर्किट

घराच्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जेव्हा अचानक जास्त करंट वाहू लागतो, तेव्हा तारांच्या इन्सुलेशन मटेरियलला आग लागते आणि दोन्ही वायर एकमेकांना चिकटतात. या घटनेला शॉर्ट सर्किट म्हणतात. असे शॉर्ट सर्किट काहीवेळा जीवघेणेही ठरू शकते.

शॉर्ट सर्किट कशामुळे होते

जेव्हा अनेक उपकरणांच्या तारा एकाच सॉकेटला जोडल्या जातात किंवा उच्च व्होल्टेजचे उपकरण कमी पॉवरच्या सॉकेटला जोडलेले असते तेव्हा तारांमधील विजेचा प्रवाह हळूहळू वाढतो, हे शॉर्ट सर्किटचे मुख्य कारण आहे.

अनेक वेळा तारांवर जास्त भार पडल्याने तारांचे इन्सुलेशन जळते, त्यामुळे फेस वायर आणि न्यूट्रल वायर एकमेकांच्या संपर्कात येतात, त्यामुळे सर्किटमध्ये विद्युतप्रवाह वाढतो आणि शॉर्ट सर्किट होते.

Short  Circuit
Rekha Short Film : बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये तासगावच्या ‘रेखा’चा डंका!

शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी काय करावं

  1. इलेक्ट्रिक उपकरण वापरल्यानंतर प्लगमधून सॉकेट अनप्लग करा.

  2. इलेक्ट्रिक उपकरणे, प्लग आणि इलेक्ट्रिकल कॉर्ड पाणी आणि आगीपासून दूर ठेवा.

  3. एका सॉकेटमध्ये एकापेक्षा जास्त विद्युत उपकरणांच्या तारा जोडू नका.

  4. एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादी उपकरणांसाठी 16 अँपिअर पॉवर सॉकेट आणि प्लग वापरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com