Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Silent Call Scam News : जाणून घ्या, या ‘सायलेंट कॉल’चा बळी होण्यापासून तुम्ही स्वत:ला कसं वाचवू शकता?
An illustration showing a smartphone receiving a silent incoming call, highlighting the rising risk of silent call scams and phone fraud.

An illustration showing a smartphone receiving a silent incoming call, highlighting the rising risk of silent call scams and phone fraud.

esakal

Updated on

What Is a Silent Call Scam? : आजकाल अनेक लोकांना असे फोन कॉल येत आहेत, जे तुम्ही उचलल्यावर काहीच आवाज येत नाही. खरंतर बहुतांश लोक काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम असेल म्हणून याकडे दुर्लक्षही करतात. परंतु प्रत्यक्षात हा  एकप्रकारचा धोकादायक असा सायलेंट कॉल स्कॅम देखील असू शकतो. कारण, आजकालच्या डिजिटल युगात वाढत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. सायबर क्राईमच्या विविध घटना तर आपण दररोज पाहत असतो.

या सायलेंट कॉलच्या वाढत्य घटनांच्या पार्श्वभूमीवर,  दूरसंचार विभागाने (DoT) त्यांच्या अधिकृत X अकाउंटद्वारे सायलेंट कॉल्सबाबत जनजागृती करण्यासाठी एक इशारा देखील जारी केला आहे. दूरसंचार विभागाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये स्पष्ट केले आहे की सायलेंट कॉल ही केवळ नेटवर्क समस्या नाही तर सायबर गुन्हेगारांकडून वापरली जाणारी एक नवीन युक्ती असू शकते. अशा कॉलद्वारे युजर्सना मोठ्या फसवणुकीसाठी लक्ष्य केले जात आहे. त्यामुळेन दूरसंचार विभागाने  मोबाइल वापरकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे आणि स्पष्ट केले आहे की तुमचा जरासा निष्काळजीपणा देखील तुमचे मोठे नुकसान करू शकतो.

स्कॅमर ‘सायलेंट कॉल’चा वापर का करतात? -

सायबर गुन्हेगार सायलेंट कॉलचा वापर करून अनेक गोष्टी लक्षात घेतात, जसे की युजर किती लवकर कॉलला उत्तर देतो. कॉल बंद होण्यास किती वेळ लागतो. कॉल उत्तर दिल्यानंतर वापरकर्त्याची पार्श्वभूमी काय आहे. या माहितीच्या आधारे  ते युजरला फसवणुकीसाठी सोपे लक्ष्य म्हणून लक्षात ठेवतात. त्यानंतर,  त्याच नंबरवर विविध स्कॅम कॉल किंवा संदेश येऊ लागतात.

An illustration showing a smartphone receiving a silent incoming call, highlighting the rising risk of silent call scams and phone fraud.
Navi Mumbai jewellery Shop Robbery video : बुरखा घालून आले अन् बंदूक दाखवत भरदिवसा 'ज्वेलरी शॉप' लुटून निघूनही गेले!

'सायलेंट कॉल'ला कॉल बॅक केल्यास काय धोके आहेत? -

सायलेंट कॉलनंतर,  फोन वापरकर्त्यास असे संदेश किंवा फोन येऊ शकतात, जसे की तुमचे बँक खाते ब्ल़ॉक केले गेले आहे. तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार आहे. तुम्ही तुमचे केवायसी अपडेट न केल्यास तुमचे सिम निष्क्रय केले जाईल.  हे कॉल अनेकदा बँक अधिकारी, सरकारी कर्मचारी किंवा ग्राहक सेवा अधिकारी असल्याचे भासवून स्कॅमर करतात,  ज्यामुळे लोक त्यांच्या शब्दांत अडकतात आणि फसवणुकीचे बळी बनवतात.

An illustration showing a smartphone receiving a silent incoming call, highlighting the rising risk of silent call scams and phone fraud.
Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

सायलेंट कॉलचा बळी होणं कसं टाळायचं? -

दूरसंचार विभागाने वापरकर्त्यांना काही महत्त्वाच्या खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.  जसे की,  कोणत्याही सायलेंट कॉलला कॉल बॅक कधीही करू नका. अज्ञात नंबरवरून येणारे कोणतेही सायलेंट कॉल हलक्यात घेऊ नका. अशा नंबरची त्वरित संचार साथी अॅप किंवा वेबसाइटवर तक्रार करा. तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका. तुमचा ओटीपी, पिन किंवा बँक तपशील कोणाशीही शेअर करू नका. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com