Simple One : लवकरच लॉन्च होणार नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जमध्ये चालेल 300 किमी

Simple One Electric Scooter Launch
Simple One Electric Scooter Launch

Simple One Electric Scooter Launch : इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि नवीन स्टार्टअप कंपन्या देखील ग्राहकांसाठी त्यांची इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहेत. बंगळुरूस्थित कंपनी सिंपल एनर्जीने अलीकडेच घोषणा केली आहे की कंपनी पुढील महिन्यात भारतीय बाजारात त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करेल.

सिंपल एनर्जीची ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर पुढील महिन्याच्या 23 तारखेला ग्राहकांसाठी लॉन्च केली जाईल. ही स्कूटर 23 मे 2023 रोजी बेंगळुरूमध्ये लॉन्च केली जाईल आणि या स्कूटरची डिलिव्हरी हळूहळू प्रत्येक विभागासाठी सुरू केली जाईल. पण बाईकची पहिली डिलिव्हरी मात्र बेंगळुरूमध्ये सुरू केली जाईल आणि येत्या काही महिन्यांत ही स्कूटर इतर शहरांमध्येही उपलब्ध होईल.

कंपनीचा दावा आहे की, सिंपल वन स्कूटर ही सर्वात वेगवान स्कूटर असेल आणि त्याच वेळी ती स्वस्त दरात आणली जाईल. इतकंच नाही तर स्कूटरमध्ये असलेली बॅटरी सुरक्षा मानके लक्षात घेऊन दिली जाणार असून या सेगमेंटमध्ये सुरक्षित बॅटरी असलेली ही स्कूटर असेल.

Simple One Electric Scooter Launch
Amruta Fadnavis : मला नरडं आहे, त्यांना गळा...; अमृता फडणवीसांच्या 'त्या' विधानावर सुषमा अंधारेंची खोचक टीका

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4.8kWh ची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासोबत असा दावा करण्यात आला आहे की एकदा बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर 236 किलोमीटर चालेल. याशिवाय, स्वॅप करता येणाऱ्या बॅटरी पॅकसह स्कूटरची रेंज 300 किमी पर्यंत वाढविली जाऊ शकते. बॅटरी 8.5kW इलेक्ट्रिक मोटरसह जोडली जाईल जी 11bhp पॉवर आणि 72Nm टॉर्क जनरेट करेल.

हेही वाचा - Types of Vedas: वेदांचे प्रकार

Simple One Electric Scooter Launch
T20 Cricket : देशासाठी नको, फक्त टी-२० लीग खेळा; 'या' खेळाडूंना IPL फ्रेंचाइजींची ५० कोटींची ऑफर

काय खास असेल?

या स्कूटरमध्ये 4G कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कॉल्स आणि म्युझिकसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मल्टिपल राइडिंग मोड्स, नेव्हिगेशन सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये मिळणार आहेत. कलर ऑप्शनबद्दल बोलायचं झाल्यास, ही स्कूटर ग्रेस व्हाइट, ब्लू, ब्लॅक आणि रेड कलरमध्ये उपलब्ध असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com