देशात सुरु होणार 5G पर्व; 'या' सहा शहरांना मिळणार सेवेचा पहिला मान

महाराष्ट्रातील दोन शहरांचा आहे समावेश
5G technology
5G technology Google

नवी दिल्ली : आता लवकरच देशात 5Gचं युग सुरु होणार आहे. यासाठी केंद्र सरकारनं जोरदार तयारीही सुरु केली आहे. यासाठी देशातील सहा बड्या शहरांची (Six Metro Cities) निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा (Two Cities Maharashtra) समावेश आहे. या वेगवान इंटरनेट सेवेसाठी यापूर्वीच ट्रायल सुरु झाल्या आहेत. (six Indian cities will be among first to witness 5G services rollout)

कोणत्या शहरांचा असणार समावेश?

दिल्ली, मुंबई, बंगळुरु, गुरुग्राम, अहमदाबाद आणि पुणे या देशातील बड्या ६ शहरांमध्येच सुरुवातीला 5G सेवा सुरु केली जाणार आहे. यासाठी देशातील सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्या जसे भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडीया यांनी या शहरांमध्ये यापूर्वीच चाचण्या सुरु केल्या आहेत.

5G technology
Online खरेदीत 'बाय नाउ पे लेटर' वापरता? मग जाणून घ्या फायदे-तोटे

सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील वर्षातील पहिल्या सहा महिन्यात केंद्रीय दूरसंचार विभागाकडून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाणार आहे. यासाठी मंत्रालय ट्रायकडून (टेलिकॉम रेग्युलॅटरी ऑथरिटी ऑफ इंडिया) शिफारसीच्या प्रतिक्षेत आहे. दूरसंचार उद्योग नियामकानं (TIR) आधीच 5G ची आधारभूत किंमत, वाटपाचं प्रमाण आणि इतर प्रश्नांसह भागधारकांच्या शिफारशींसाठी सल्लामसलत कागदपत्रं तयार ठेवली आहेत.

5G technology
मुलांचं लसीकरण, बूस्टर डोसबाबत केंद्राकडून नियमावली जाहीर

भारतीय दूरसंचार कंपन्यांना पुढील आर्थिक वर्षात ऑपरेटिंग नफ्यात 40 टक्के वाढ होण्याची आशा आहे, ज्यामुळं त्यांना गुंतवणुकीसाठी आणि 5G सेवा सुरू करण्यासाठी मोकळीक मिळेल. ज्यासाठी जास्त गुंतवणूक आवश्यक आहे. उच्च दर आणि उत्तम ARPU आणि सरकारच्या स्थगित पेमेंट स्ट्रक्चरमुळे पुढील आर्थिक वर्षात ऑपरेटिंग नफा 72,000 कोटींवरून 1 लाख कोटींपर्यंत वाढ होऊ शकते. सुरुवातीला असं निरक्षण नोंदवण्यात आलं होतं की, टेलकोसना 5G स्पेक्ट्रमसाठी किमान 70,000 कोटी रुपयांची आवश्यकता भासेल. सुरुवातीला मेट्रो आणि 'अ' श्रेणीच्या शहरांमध्ये जिथं इंटरनेटच्या वापराचं प्रमाण जास्त आहे.

इंटरनेट कनेक्शनची वाढ

दळणवळण मंत्रालयाच्या अलिकडील आकडेवारीनुसार, मार्च 2014 मध्ये इंटरनेट कनेक्शन 25.15 कोटींवरून जून 2021 मध्ये 83.37 कोटींवर पोहोचलं, यामध्ये 231 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ब्रॉडबँड कनेक्शन मार्च 2014 मध्ये 6.1 कोटींवरून जून 2021 मध्ये 79 कोटींवर पोहोचले, यामध्ये सुमारे 1200 टक्के वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com