Skoda slavia Launched in India : स्कोडा स्लाव्हिया आज भारतात लॉंच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

skoda slavia launches in india today know it s price features engine and all details

स्कोडा स्लाव्हिया आज भारतात लॉंच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Skoda Auto India ने आज त्यांचा नवीन Slavia 1.0 TSI सेडान लाँच केली आहे, ज्याची किंमत 10.69 लाख रुपयांपासून सुरु होत (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने ही कार लॉन्च करण्यापूर्वी एक खास ऑफर दिली आहे, ज्या अंतर्गत स्कोडा कंपनी तुम्हाला चार वर्षांचे मेन्टेनन्स पॅकेज देणार आहे. या पॅकेजमध्ये स्लाव्हियाचा मेन्टेनन्स कॉस्ट फक्त 0.46 पैसे/किमी असेल.

व्हेरिएंटनुसार किंमत

मॉडेल - 1.0 TSI (MT) - 1.0 TSI (AT)

एक्टिव्ह 10,69,000 लाख रुपये

एम्बिशन 12,39,000 लाख रुपये - 13,59,000 लाख रुपये

स्टाईल 13,99,000 लाख रुपये - 15,39,000 लाख रुपये

मेन्टेनन्स पॅकेज ऑफर

कंपनीने ही कार लॉन्च करण्यापूर्वी एक खास ऑफर दिली आहे, ज्या अंतर्गत स्कोडा कंपनी तुम्हाला चार वर्षांचे मेन्टेनन्स पॅकेज देणार आहे. या पॅकेजमध्ये स्लाव्हियाचा मेन्टेनन्स खर्च फक्त 0.46 पैसे/किमी असेल. सुटे भागांची किंमत, इंजिन ऑईलची किंमत आणि मजुरीचा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. या पॅकेजची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: शिवराय आणि रामदासांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही - सुप्रिया सुळे

लाँच करण्यापूर्वीच जबरदस्त प्रतिसाद

2022 स्कोडा स्लाव्हिया ला लॉन्च होण्यापूर्वीच जबरदस्त प्रतिसाद मिळाला. फेब्रुवारीमध्ये अधिकृत लॉन्च होण्यापूर्वीच सेडान देशभरातील विविध डीलरशिपवर येण्यास सुरुवात झाली. स्कोडा स्लाव्हियाच्या किंमतींची घोषणा आणि लॉन्च होण्यापूर्वीच, 4,000 कारचे बुकिंग आधीच प्राप्त झाले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही ग्राहकाने त्याचे बुकिंग रद्द केलेले नाही.

इंटीरियर

स्कोडा स्लाव्हियाचे इंटीरियर कंफर्ट आणि फीचर्स लक्षात घेऊन तयार केले गेले आहेत, जे दिसायला खूपच आकर्षक आहेत. सर्कुलर एसी व्हेंट्स, लेयर्ड डॅश, दोन स्पोक स्टीयरिंग व्हील, दरवाजांमधील एक्सेंट आणि सेंटर कन्सोल आणि गीअर लीव्हरची दमदार क्वालिटी स्लाव्हियाला त्याच्या वरच्या अनेक सेगमेंटपैकी उत्कृष्ट कार बनवते. त्याची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम वापरून तुम्हाला सुखद अनुभव मिळतो.

हेही वाचा: बापरे! युट्यूब बघून फार्मसी विद्यार्थ्यांनी केली लिंगबदल शस्त्रक्रिया; एकाचा मृत्यू

सेफ्टी फीचर्स

स्कोडा स्लाव्हियामध्ये सुरक्षेसाठी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. इंजिन कंट्रोल युनिट, स्टीयरिंग, सस्पेंशन, टायर्स किंवा ब्रेक सिस्टम तुम्हाला अपघातापासून दूर ठेवतात आणि काही अनुचित प्रकार घडल्यास नुकसान कमी करतात. टायर प्रेशर मॉनिटरिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स आणि रेन-सेन्सिंग वायपरसह, कार तुमची सर्व हवामानाक सुरक्षितता सुनिश्चित करते आणि ड्रायव्हिंग करताना तुम्हाला चांगली व्हिजीबिलीटी आणि कंट्रोल देते.

इंजिन

इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास , SLAVIA 1.0 TSI मध्ये 3-सिलेंडर इंजिन दिले आहे जे 115 PS पॉवर आणि 178 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. स्लाव्हिया 1.0 TSI 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह देण्यात आली आहे.

हेही वाचा: Asus 8z भारतात लॉंच; मिळेल 64MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर अन् बरंच

Web Title: Skoda Slavia Launches In India Today Know It S Price Features Engine And All Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Automobile
go to top