स्मार्टफोन टिप्स : आता तुम्हाला PUBG खेळताना येणार नाही स्लो इंटरनेटची समस्या

चला जाणून घेऊया स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड कसा वाढवायचा?
 internet speed
internet speedesakal

नवी दिल्ली : आजच्या काळात इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. थोडक्यात काय तर इंटरनेट मुलभूत गरज झाली आहे. इंटरनेटशिवाय ना अभ्यास करता येतो, ना ऑफिसचे कोणतेही काम करता येते. आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच इंटरनेट (Internet) वापरतात. अशा परिस्थितीत कधी-कधी इंटरनेट स्लो असल्यामुळे बहुतेक लोक नाराज होतात, तर चला जाणून घेऊया की स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड (Smart Phone Internet Speed) कसा वाढवायचा... (Smart Phone Tips No Internet Issue While Playing PUBG)

 internet speed
Oppoचा 5G स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत

कोणती सेटिंग्ज कशी बदलायची?

1) फोन हा सेटिंग्ज कॅशे भरल्यानंतर, Android फोन स्लो होतो. ज्यामुळे इंटरनेटच्या गतीवर परिणाम होतो. त्यामुळे वेळ मिळाला की कॅशे साफ करत रहा. यामुळे तुमच्या मोबाईलचा इंटरनेट स्पीड वाढेल.

2)फोन सेटिंग्जवर जा आणि नेटवर्क सेटिंग्ज पर्यायामध्ये निवडलेल्या नेटवर्क प्रकारात 4G किंवा LTE आहे का ते पाहा. नसल्यास, तेथे उपलब्ध पर्याय निवडा.

3) फोन री-स्टार्ट करा. फोन री-स्टार्ट झाल्यावर, तो पुन्हा मोबाईल नेटवर्क शोधतो. त्यामुळे डेटाचा वेग वाढतो म्हणजे स्पीड वाढतो.

4)फोन वापरतांना अनेकदा खुप लोक चुकून स्मार्टफोनमध्ये स्वयं-डाउनलोड चालु ठेवतात. त्यामुळे आपोआप काही ॲप डाऊनलोड होतात. त्याचा असर मग मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या डेटावर होतो. यामुळे देखील स्लो इंटरनेटचीही समस्या येऊ शकते.

 internet speed
टेक करिअर : रोबोटिक्स, इंडस्ट्रिअल इंटरनेट ऑफ थिंग्ज

5) ऑटो डाउनलोड तपासण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जा. स्वयं-अपडेट वैशिष्ट्य चालु असल्यास, ते बंद कराआणि अनुप्रयोग आणि सॉफ्टवेअर करता WiFi वापरा.

6) एअरपोट मोड चालु करुन पुन्हा बंद करा. असे केल्याने मोबाईल नेटवर्क पुन्हा शोधले जाईल आणि इंटरनेटचा वेग वाढेल.

7) जे ॲप आपण वापरत नाही किंवा ज्याची गरज नाही असे ॲप मोबाईलमधून डिलीट करुन टाका. कारण बहुतेक वेळा विनाकारणे खुप ॲप चालु ते तुमचा डेटा वाया घालवतात. त्यांना सेटिंग्जमध्ये बंद करा. तसेच, ब्राउझरमध्ये डेटा सेव्ह मोड करुन ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com