Air Pollution : आता तुमचा स्मार्टफोन सांगणार आजूबाजूच्या हवेची गुणवत्ता; स्टार्टअप कंपनीने तयार केलं खास अ‍ॅप

मोबाईल फिजिक्सचं अ‍ॅप बॅकग्राऊंडमध्ये आजूबाजूची हवा स्कॅन करू शकतं. अगदी तुमचा स्मार्टफोन खिशात असला, तरीही ते कार्यरत राहतं.
Air Pollution mobile App
Air Pollution mobile AppeSakal

Mobile Physics App to Check AQI : आपल्या हातात असणारे स्मार्टफोन्स हे दिवसेंदिवस अधिक हायटेक होत चालले आहेत. यातच एका स्टार्टअप कंपनीने हवेची गुणवत्ता आणि प्रदूषणाचा स्तर मोजता येणारा खास सेन्सर सूट तयार केला आहे. यामुळे तुमचा स्मार्टफोनच तुम्हाला आजूबाजूच्या हवेची गुणवत्ता कशी आहे याची माहिती देऊ शकणार आहे.

मोबाईल फिजिक्स नावाच्या स्टार्टअप कंपनीने ही एअर मॉनिटरिंग टेक्नॉलॉजी तयार केली आहे. ही टेक्नॉलॉजी स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटला सपोर्ट करते. क्वालकॉम कंपनीने नुकताच हा प्रोसेसर लाँच केला आहे. ही टेक्नॉलॉजी मोबाईल कंपन्यांनी स्वीकारल्यास नव्या फोनमध्ये हे अ‍ॅप प्री-लोडेड मिळण्याची शक्यता आहे.

मोबाईल फिजिक्स कंपनीचे चेअरमन डॉ. रॉजर कोर्नबर्ग हे नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक आहेत. त्यांनी CNET वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, की "जेव्हा तुम्ही स्मार्टफोन वापरता, तेव्हा हे अ‍ॅप PM2.5 पॉल्युटंट पार्टिकल (2.5 मायक्रॉनपेक्षा लहान कण) मोजणार आहे. ज्याप्रमाणे फोनचे कॅमेरा आणि इतर सेन्सर हे आजूबाजूचं तापमान मोजू शकतात, किंवा अ‍ॅपलच्या वॉचमधील टेक्नोलॉजी रक्तातील ऑक्सिजन मोजू शकते, त्याच प्रमाणे आमची टेक्नोलॉजी हवेतील कणांचा अभ्यास करू शकते."

Air Pollution mobile App
Air Pollution India : हवा प्रदूषणामुळे देशात वर्षाला वीस लाख बळी; आंतरराष्ट्रीय संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

"मोबाईल फिजिक्सचं अ‍ॅप बॅकग्राऊंडमध्ये आजूबाजूची हवा स्कॅन करू शकतं. अगदी तुमचा स्मार्टफोन खिशात असला, तरीही ते कार्यरत राहतं. जर मोबाईल यूजर बऱ्याच वेळापासून उन्हात असेल, तर हे अ‍ॅप ते ओळखून यूजरला सावलीत जाण्यास सांगेल. तसंच आजूबाजूची हवा प्रदूषित आहे असं वाटल्यास हे अ‍ॅप यूजरला एअर प्युरिफायर सुरू करण्याचा सल्ला देईल."

स्मोक मॉनिटर वाचवणार जीव

याच टेक्नॉलॉजीचा वापर करून हे अ‍ॅप आजूबाजूला असणारा धूरही ओळखू शकतं. त्यामुळे रात्री झोपताना अ‍ॅप सुरू ठेवल्यास, आगीसारख्या घटनांवेळी अलर्ट मिळणं शक्य होणार आहे. रुममध्ये किंवा घरात भरपूर धूर होऊ लागताच हे अ‍ॅप इशारा देऊ शकणार आहे.

Air Pollution mobile App
Scientists Talk To Whale : शास्त्रज्ञांनी चक्क व्हेलशी मारल्या गप्पा; आता एलियन्सशी संवाद साधताना होणार संशोधनाचा फायदा

सध्या हे अ‍ॅप कोणत्याही फोनमध्ये उपलब्ध नाही. गुगल पिक्सेल 8 आणि श्याओमी 11 अल्ट्रा अशा फोनमध्ये या अ‍ॅपची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये STmicroelectronic बेसिक सेन्सर आणि स्पेसिफिक असं VL53L8 हे टाईम-ऑफ-फ्लाईट सेन्सर आहे. एअर स्कॅनिक टेकसाठी हे सेन्सर आवश्यक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com