Smartphone Tips : सारखा स्मार्टफोन चार्ज करण्यापासून होईल सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smartphone Tips

Smartphone Tips : सारखा स्मार्टफोन चार्ज करण्यापासून होईल सुटका

जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करणार असाल आणि बॅटरी लाईफची चिंता करत असाल तर आता काळजी करू नका. साधारणपणे असं लक्षात आलं आहे की थोड्याशा निष्काळजीपणांमुळे बॅटरी पहिल्यासारखी चालत नाही अस लक्षात येतं. लोक याकडे दुर्लक्ष करतात. जोवर फोन नवा असतो तोवर नीट चालते जसा फोन जुना होतो तशा बॅटरी प्रॉब्लेम सुरू होतात. मग सारखं चार्ज कराव लागत.

जर तुम्हाला वाटत असेल बॅटरी खूप वेळ चालावी आणि सारखी चार्ज करण्याची गरज पडू नये तर इथे आम्ही काही सोप्या टिप्स देत आहोत. हे वापरून तुम्ही तुमच्या फोनची बॅटरा लाईफ वाढवू शकाल.

हेही वाचा: Video: भारतात पहिला टेलिफोन आणि जगात पहिला मोबाईल फोन कधी आला?

स्मार्टफोनला करा रीबूट

जर तुम्ही फोनला सारख रीबूट (Reboot) केलं याचा स्मार्टफोनवर चांगला परिणाम होतो. रीबूट केल्याने फोन आपल्या पूर्ण क्षमतेने चालतो आणि स्पीडपण चांगला राहतो. जर तुम्ही प्रत्येक आठवड्याला फोन रीबूट करत राहिलात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. पण जर खूप महिने रीबूट न करता फोन वापरत राहीलात तर बॅटरी हळूहळू काम करणे कमी करते.

हेही वाचा: तुमचा स्मार्टफोन पावसात भिजला असेल तर या गोष्टी टाळा

मोठ्या फाईल्स डिलीट करा

जर तुम्ही फोनमधल्या हेवी फईल्स वेळच्या वेळी डिलीट नाही केल्या तर त्याचा ताण फोनच्या प्रोसेसरवर येतो. आणि बॅटरीपण जास्त वापरली जाते. जेंव्हा बॅटरीचा वापर क्षमपेक्षा वाढतो तेंव्हा त्याची क्षमता कमी होते. त्यामुळे फोन पूर्ण कपॅसिटीने चालावा असे वाटत असेल तर हेवी फईल्स वेळोवेळी काढणे आवश्यक आहे.

हेही वाचा: सॅमसंगचा आणखी एक 5G फोन लॉंच; मिळेल पावरफुल बॅटरी-कॅमेरा

Web Title: Smartphone Battery Problem Charging Problem Frequently Need To Charge The Smartphone

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..