Smartphone Hack: 'या' छोट्याशा गोष्टीवरून लक्षात येईल की तुमचा मोबाईल हॅक झाला आहे

भारतात स्मार्टफोन हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हॅकर्स मोबाइल अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे प्रसिद्ध लोकच नाही तर सर्वसामान्यांना देखील निशाणा बनवत आहेत.
Smartphone Hack
Smartphone Hacksakal

तुमच्या अस वाटतं का की कुणी तुमचा फोन हॅक केला आहे? जर आपला फोन हॅक झाला तर ते आपल्याला कस कळणार असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम आज आपण या लेखात करणार आहोत.

भारतात स्मार्टफोन हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हॅकर्स मोबाइल अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे प्रसिद्ध लोकच नाही तर सर्वसामान्यांना देखील निशाणा बनवत आहेत. मॅलेशियस अ‍ॅप आणि टूलच्या साहह्याने हॅकिंग केले जाते. मात्र, फोनमधील काही गोष्टींवर लक्ष ठेवून तुम्ही तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना हे पाहू शकता. फोन हॅक झाला आहे की नाही हे कसे ओळखाल ? याबाबत जाणून घेऊया.

Smartphone Hack
Mobile Hacking: 'Spyware' अॅपने तुमचा स्मार्टफोन हॅक तर होत नाहीये? या सोप्या ट्रीक्सने चेक करा

● फोनची बॅटरी वेगाने समाप्त होणे.

जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी नेहमीच्या तुलनेत अधिक वेगाने समाप्त होत असेल तर फोनमध्ये मॅलवेअर अथवा बनावट अ‍ॅप असू शकते. निष्कर्षावर पोहचण्याआधी तुम्ही बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले अ‍ॅप देखील तपासून पाहावेत. अनेकदा बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅपमुळे देखील बॅटरी लवकर समाप्त होते. त्यामुळे हे अ‍ॅप बंद करावे व त्यानंतर पाहावे.

● मोबाईलचे स्लो होणे.

जर तुमचा मोबाइल अचानक स्लो झाला असेल अथवा वारंवार हँग होत असल्यास डिव्हाइसच्या बॅकग्राउंडमध्ये मॅलवेअर असू शकते. त्यामुळे फोनला त्वरित फॅक्ट्री रीसेट करावे. यामुळे मॅलवेअर अ‍ॅप डिलीट होतील.मोबाइल अ‍ॅप क्रॅश होणे . जर तुमच्या फोनमध्ये अ‍ॅप ओपन केल्यावर वारंवार क्रॅश होत असेल अथवा वेबसाइट लोड होण्यास नेहमी पेक्षा अधिक वेळ लागत असल्यास तुमचा फोन हॅक झाला असण्याची देखील शक्यता आहे.पॉपअप आणि जाहिराती

● अनेकदा आपण एखादा अ‍ॅप अथवा वेबसाइटवर गेल्यावर अचानक पॉपअप-जाहिरात दिसते. कदाचित तुमच्या फोनमध्ये मॅलवेअर असण्याची शक्यता आहे. यापासून वाचण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅप वापरणे टाळावे. असे केल्यास तुमचा फोन आणि खासगी डेटा सुरक्षित राहिल.

Smartphone Hack
जिओ-गुगलचा Jio Phone Next लॉन्च; जाणून घ्या खास फीचर्स

● फ्लॅश लाइट आपोआप सुरू होणे.

तुम्ही मोबाइल वापरत नसताना देखील डिव्हाइसची फ्लॅश लाइट सुरू होत असल्यास कदाचित हॅकर तुमच्या फोनला कंट्रोल करत असण्याची शक्यता आहे.

● सतत अनोळखी फोन आणि SMS येणे

हा देखील तुमचा फोन हॅक झाला संकेत असु शकतो. असही होऊ शकतं की, हॅकर ने तुमच्या फोन हा ट्रोजन मैसेजने सुध्दा ट्रैप केला असु शकतो. तुमच्यासोबत हॅकर असुन तुमच्या जवळच्या व्यक्तीचा फोन देखील हॅक करू शकतो.त्यामुळे तुम्हाला मैसेजने एखादी लिंक आली तर विचार करून तिच्यावर क्लिक करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com