esakal | 12 हजारांत 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा असलेले स्मार्टफोन, पाहा यादी
sakal

बोलून बातमी शोधा

12 हजारांत 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा असलेले स्मार्टफोन, पाहा यादी

12 हजारांत 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा असलेले स्मार्टफोन, पाहा यादी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Amazon Great Indian Festival Sale 2021: Amazon कंपनीने ग्राहकांसाठी अनेक बेस्ट स्मार्टफोन विक्रीसाठी सादर केले आहेत. या सर्व स्मार्टफोनच्या किंमतीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहेत. आज आपण तुमच्यासाठी 7000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेरा फोन आणि 12,000 रुपयांच्या खाली किंमत असेलल्या काही बेस्ट स्मार्टफोन्स ऑप्शन्सबद्दल जाणून घेणार आहेत.

रेडमी 9 पावर (Redmi 9 Power)

Redmi 9 Power या स्मार्टफोनमध्ये 13MP चा क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून फोनचा प्रायमरी सेन्सर 13MP आहे. याशिवाय 8 एमपी वाइड अँगल लेन्स, 5 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोन MediaTek Helio G80 प्रोसेसरसह येईल ज्यामध्ये 6.53-इंच HD + डिस्प्ले आहे. पॉवर बॅकअप साठी फोनमध्ये तुम्हाला 5020mAh ची बॅटरी मिळेल. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. किंमत - 10,499 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी ए 03 एस (Galaxy A03s)

Galaxy A03s स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच HD + Infinity-V डिस्प्ले दिलेला असून फोन अडव्हांस ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो पी 35 प्रोसेसरसह येतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित वन यूआय 3.1 वर काम करतो. तसेच Galaxy A03s स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्याचा प्रायमरी कॅमेरा 13MP आहे. याशिवाय 2MP मॅक्रो लेन्स 2 एमपी डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. फोन लाइव्ह फोकस आणि इतर अनेक फिल्टरसह येईल. पॉवर बॅकअप साठी फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत - 11,4999 रुपये

हेही वाचा: Amazon-Flipkart सेलमध्ये 'हे' आहेत सर्वात स्वस्त स्मार्टफोन

टेक्नो पोवा 2 (Tecno POVA 2)

Tecno POVA 2 मध्ये 6.9-इंच FHD+ डिस्प्ले दिला असून यामध्ये ऑक्टा-कोर हेलिओ जी 85 एक ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. फोन माली-जी 52 जीपीयू सपोर्टसह येईल. टेक्नो पोवा 2 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला असून प्रायमरी कॅमेरा 48MP AI देण्यात आला आहे. याशिवाय 2 एमपी मॅक्रो लेन्स, 2 एमपी डेप्थ सेन्सरला सपोर्ट मिळेल. तसेच फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन बिल्ट-इन हायपर इंजिन गेमिंग टेक्नोलॉजीसह येईल. फोन 18W ड्युअल आयसी फास्ट चार्जरला फोनमध्ये सपोर्ट करण्यात आला आहे. किंमत - 10,999 रुपये

रेडमी 9 प्राइम (Redmi 9 Prime)

Redmi 9 Prime मध्ये 6.53-इंच फुल HD + IPS पॅनल देण्यात आले असून फोन MediaTek Helio G80 प्रोसेसर वर चालतो. हा फोन MIUI 11 वर Android 10 OS वर काम करतो. रेडमी 9 प्राइममध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून फोनचा मुख्य कॅमेरा 13MP देण्यात आला आहे. याशिवाय 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi 9 Prime मध्ये 5020mAh ची बॅटरी मिळेल, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल, जी 10W चार्जरला सपोर्ट करेल. किंमत - 9,999 रुपये

हेही वाचा: बाईक इतके मायलेज देतात 'या' सीएनजी कार, पाहा किंमत आणि फिचर्स

Oppo A12G

Vivo Y12G स्मार्टफोन मध्ये 6.51 इंच Divu Drop Notch डिस्प्ले सह सादर करण्यात देण्यात आला आहे. फोनमध्ये HD + (720 x 1600 पिक्सल) रिझोल्यूशन सपोर्ट मिळणार आहे. हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13MP आहे. याशिवाय 2 एमपी डेप्थ सेन्सर, एलईडी फ्लॅश सपोर्ट असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. प्रोसेसर म्हणून, Vivo Y12G स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 439 SoC चिपसेटला देण्यात आले आहे. पॉवर बॅकअपसाठी, Vivo Y12G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली असून ती 10W चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. फोन अँड्रॉइड 11 फनटच 11 वर काम करेल. किंमत - 11,990 रुपये

loading image
go to top