Social Media Mistakes : Social Media वर कधीच शेअर करू नका असे फोटो, नसत्या भानगडीत अडकाल

एखाद्या कंपनीबद्दल कितीही वाईट मत असलं तरी ते सोशल मिडियावर पोस्ट करू नका
Social Media Mistakes
Social Media Mistakesesakal

Social Media Mistakes :

आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करते. इतरांशी कनेक्ट राहण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी हे एक Best Platform आहे. अनेकदा असे दिसून येते की लोक त्यांचे फोटो, व्हिडिओ किंवा पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात.

अर्थात असे करण्यात काही नुकसान नाही, पण तरीही तुम्ही सोशल मीडियाचा वापर खूप विचारपूर्वक केला पाहिजे. अनेक वेळा आपण नकळत अशा काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतो, ज्याचा आपल्या करिअरवर आणि प्रोफेशनल इमेजवर नकारात्मक परिणाम होतो.

Social Media Mistakes
Social Media : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई; गुन्हा दाखल करण्याचा इशारा - चंद्रशेखर यादव

अशा परिस्थितीत आपल्याला नंतर पश्चाताप करावा लागतो, म्हणून आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या तुम्ही सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.

कामाचा फोटो

अनेक वेळा असे घडते की ऑफिसमध्ये काम करताना आपण आपला फोटो काढतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो. तथापि, आपण हे करणे टाळावे. खरं तर, जेव्हा तुम्ही हे पुन्हा पुन्हा करता तेव्हा ते असा मेसेज जातो की, ऑफिसच्या वेळेतही तुमचे लक्ष कामावर नसते आणि तुम्ही सोशल मीडियावर जास्त वेळ घालवता. तुमची ही छोटीशी चूक तुम्हाला नंतर महागात पडू शकते.

Social Media Mistakes
Social Media Day : ३० जूनलाच का साजरा केला जातो सोशल मीडिया दिन? जाणून घ्या

कंपनीबद्दलची नकारात्मक पोस्ट करू नका

तुम्ही तुमच्या क्षेत्राशी संबंधित कोणत्याही कंपनीबद्दल सोशल मीडियावर कधीही नकारात्मक पोस्ट करू नये. कारण, संबंधित कंपनीबद्दल जरी तुमचं नकारात्मक मत असलं तरी देखील ते सोशल मिडियावर जाहीर करू नका. यामुळे तुम्हाला पुढील नोकरीत अनेक अडचणी येऊ शकतात.

असं ही होऊ शकतं की, ज्या कंपनीबद्दल तुम्ही नकारात्मक लिहिले आहे त्याच कंपनीकडून तुम्हाला नंतर संपर्क साधला जाईल. एवढेच नाही तर तुमची कंपनी एचआर अशा पोस्ट वाचते तेव्हा तुमच्या इमेजलाही धक्का पोहोचू शकतो.

Social Media Mistakes
Social Media : सोशल मीडियावर जास्त वेळ घालवण्याने झाला नागरिकांना मानसिक आरोग्यावर परिणाम

कंपनीचे सिक्रेट्स

प्रत्येक कंपनीची काम करण्याची स्वतःची पद्धत असते. साधारणपणे कंपन्या त्यांची सूत्रे किंवा गुपिते कोणालाच उघड करत नाहीत. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच याची माहिती आहे. पण अनेक वेळा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कामामुळे किंवा कंपनीमुळे त्रासलेली असते तेव्हा तो कंपनीचे रहस्य सोशल मीडियावर शेअर करतो.

तुम्ही कंपनीत असाल किंवा तुमची नोकरी सोडली असेल, ही चूक चुकूनही करू नका. यामुळे तुमची व्यावसायिक प्रतिमा आणि विश्वासार्हता यावर प्रश्न निर्माण होतात.

Social Media Mistakes
Social Media Addiction: ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’मुळे होतोय लहान मुलांच्या मानसिक आरोग्याशी खेळ ; मेटा विरोधात खटला दाखल

जास्त पर्सनल माहिती सांगू नका

आजकाल लोक मी कुठे फिरलो, काय खाल्लं, तिथे किती दिवस होतो अशा अनेक गोष्टी सोशल मिडियावर उघड करतात. आपण सर्वजण आपल्या आयुष्याशी संबंधित वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करतो.

जास्त माहिती शेअर केल्याने तुम्ही Unprofessional वाटू शकता. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, आरोग्याच्या समस्यांबद्दल किंवा आर्थिक समस्यांबद्दल बोललेच पाहिजे असे नाही.

ज्या पद्धतीने तुम्ही ऑफिसमध्ये इमेज जपता. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या ऑनलाइन उपस्थितीबद्दल थोडे सावध असले पाहिजे. त्यामुळे आता तुम्ही सोशल मीडियाचा अधिक विचारपूर्वक वापर करून तुमची Professional Image खराब होण्यापासून वाचवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com