PlayStation 5 Slim : गेमर्ससाठी खुशखबर! भारतात सुरू होणार 'प्लेस्टेशन 5 स्लिम'ची विक्री; किती असेल किंमत?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Playstation 5 Slim चे भारतात डिस्क आणि डिजिटल हे दोन्ही व्हर्जन उपलब्ध असणार आहेत.
PlayStation 5 Slim
PlayStation 5 SlimeSakal

Sony Playstation 5 Slim in India : भारतातील गेमर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. सोनीच्या 'प्लेस्टेशन 5'चं स्लिम कन्सोल हे आता भारतात उपलब्ध होणार आहे. हे कन्सोल नोव्हेंबर 2023 मध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर आता 5 एप्रिलपासून हे भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

दोन्ही व्हर्जन मिळणार

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Playstation 5 Slim चे भारतात डिस्क आणि डिजिटल हे दोन्ही व्हर्जन उपलब्ध असणार आहेत. PS5 Slim हा कन्सोल मुख्य कन्सोलच्या तुलनेत अधिक हलका आणि नावात दिल्याप्रमाणेच स्लिम आहे. त्यामुळे कमी जागेमध्ये देखील हा आरामात फिट होऊ शकतो. (Gaming News)

किती असेल किंमत?

भारतात PS5 स्लिम व्हर्जन हे त्याच्या मूळ व्हर्जनच्या किंमतीलाच उपलब्ध होणार आहे. याचं डिस्क व्हर्जन हे 54,990 रुपयांना उपलब्ध असेल. तसंच, याचं डिजिटल व्हर्जन हे 44,990 रुपयांना उपलब्ध असेल.

Playstation 5 Slim व्हर्जनमध्ये एक डिटॅचेबल डिस्क ड्राईव्ह आणि अधिक स्टोरेज देण्यात येतं. याच्या डिजिटल व्हर्जनमध्ये डिस्क ड्राईव्ह मिळत नाही, ती वेगळी खरेदी करता येते.

PlayStation 5 Slim
Online Gaming : ऑनलाईन गेमिंगसाठी आता सरकार स्वतःच तयार करणार नियमावली; 'SRO'चा पर्याय रद्द - रिपोर्ट

कुठून करता येईल खरेदी?

PS5 Slim हा भारतात 5 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअरमध्ये देखील हे गेमिंग कन्सोल खरेदी करता येईल.

प्लेस्टेशन 5 चे हे नवीन व्हर्जन सोनीची ShopatSC, अमेझॉन, फ्लिपकार्ट, गेम्स दि शॉप अशा वेबसाईट्सवर उपलब्ध होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com