
Sony ने आपले नवीन नॉईज कॅन्सलिंग हेडफोन - WH-1000XM5 भारतीय वापरकर्त्यांसाठी लॉन्च केले आहेत. कंपनीने हे हेडफोन्स मे महिन्यात जागतिक बाजारपेठेत लॉन्च केले आणि आता त्यांची एंट्री भारतात झाली आहे. यामध्ये कंपनी चांगल्या आवाजासाठी 30mm ऑडिओ ड्रायव्हर सेटअप देत आहे. ते 30 तासांच्या बॅटरी लाइफसह येतात. या लेटेस्ट सोनी हेडफोनची किंमत 26,999 रुपये आहे. हे Amazon India वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यांची शिपिंग 8 ऑक्टोबरपासून सुरू होईल.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
ओव्हर द इअर डिझाइनसह या हेडफोन्समध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.2 देण्यात आला आहे. 30mm डायनॅमिक ड्रायव्हर याची साउंड क्वालिटी कित्येक पटीने उत्कृष्ट बनवतो. यामध्ये तुम्हाला SBC, AAC, LDAC ऑडिओ फॉरमॅटचा सपोर्ट मिळेल. चांगल्या आवाजाच्या स्पष्टतेसाठी त्यांच्यामध्ये DSEE एक्स्ट्रीम देखील देण्यात आला आहे.
हे हेडफोन नवीन V1 प्रोसेसरसह येतात, जे HD नॉइस कॅन्सीलेशन करण्यासाठी QN1 प्रोसेसर अनलॉक करतात. तसेच यामध्ये उत्कृष्ट नॉइस कॅन्सीलेशन करण्यासाठी, कंपनी 8 माइक देत आहे. हेडफोन्सची रचना दंडगोलाकार आहे आणि त्यांचे इअरकप बाजूला फिरवता येतात.
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास , ती ANC चालू असल्यास एका चार्जवर 30 तासांपर्यंत टिकू शकते. त्याच वेळी, ANC शिवाय, त्यांची बॅटरी 40 तासांपर्यंत राहते. कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर, हे हेडफोन 24 ते 32 तास आरामात टिकतात. हेडफोन चार्ज करण्यासाठी USB Type-C पोर्ट आहे. तर हे हेडफोन चार्ज करण्यासाठी सुमारे 3.5 तास लागतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.