उष्णतेचे विजेत रुपांतर करणारी उपकरणे येणार

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

वॉशिंग्टन - इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात रोज नवनवे प्रयोग होत असतात. उष्णतेचे रुपांतर विजेमध्ये करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणावर संशोधन सुरु असून, छोट्या उपकरणांमध्ये देखील तयार होणाऱ्या उष्णतेचे रुपांतर विजेमध्ये करण्याची सोय यामुळे उपल्बध होणार आहे. 

यापूर्वी ओहीयो स्टेट युनिव्हर्सिटिच्या काही संशोधकांनी या प्रकारचे उष्णतेचे रुपांतर विजेत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आता विविध उद्योग क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर कश्याप्रकारे करता येईल याबाबतचे संशोधन करण्यात येत आहे. 

या संशोधनाचा वापर अगदी एखाद्या गाडीच्या इंजिनद्वारे निर्माण होणाऱ्या उष्णतेचे रुपांतर विजेत करण्यासाठी देखील करता येऊ शकतो. त्यामुळे अनेक उद्योग क्षेत्रात याचा वापर करता येणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. 

ओहीयो स्टेट युनिव्हर्सिटिच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण वापरत असलेल्या उर्जेचा जो भाग वाया जातो तो वातावरणात उष्णतेच्या रुपात मिसळला जातो. याला 'वेस्ट हिट' असे म्हणतात. हे नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यास ही वाया जाणारी उर्जा वापरात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 
 
Web Title: Soon, devices that convert heat into electricity

टॅग्स