
Starlink Internet India : देशातील इंटरनेट सेवा क्षेत्रात लवकरच मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे. इलॉन मस्क यांच्या मालकीची स्पेसएक्सची उपकंपनी स्टारलिंक आणि अन्य आंतरराष्ट्रीय कंपन्या लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. या सेवा अवघ्या 840 रुपये दरमहा इतक्या स्वस्त दरात मिळणार असल्याची शक्यता आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात सॅटेलाइट इंटरनेटसाठी लागणाऱ्या स्पेक्ट्रमच्या किमतींबाबत महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. या शिफारशींवर आधारित विश्लेषकांचे मत आहे की कंपन्या भारतात सॅटेलाइट इंटरनेटच्या अनलिमिटेड डेटा प्लॅनसाठी दरमहा 10 डॉलरपेक्षा कमी म्हणजेच जवळपास 840 रुपये इतका सुरुवातीचा दर ठेवू शकतात.
विशेष म्हणजे अशा कमी दरातून कंपन्यांचा उद्देश मोठ्या प्रमाणावर ग्राहक आधार वाढविण्याचा आहे. Starlink आणि इतर कंपन्या भारतात 10 मिलियन (1 कोटी) ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मानस बाळगून आहेत. हे करताना, उच्च पायाभूत सुविधा खर्च आणि स्पेक्ट्रमचे दर हे आर्थिकदृष्ट्या सावरता येतील, असा विश्वास विश्लेषक व्यक्त करत आहेत.
TRAI च्या नव्या धोरणांनुसार, सेवा पुरवठादार कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या 4% इतकी रक्कम सरकारला कररूपाने द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, शहरी भागात सेवा देणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक ग्राहकामागे दरवर्षी 500 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. मात्र ग्रामीण भागात ही अतिरिक्त रक्कम लागणार नाही, ज्यामुळे ग्रामीण भागात सेवा आणखी परवडणारी ठरणार आहे.
जागतिक सल्लागार संस्था Analysys Mason चे पार्टनर अश्विंदर सेठी यांनी सांगितले की, "स्पेक्ट्रम आणि परवाना शुल्क जरी महागडे असले तरी, ग्राहक आकर्षित करण्यासाठी सेवा देणाऱ्या कंपन्या सुरुवातीला 840 रुपयांच्या आत दर ठेवण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळवून खर्च सावरणे शक्य होईल."
मात्र IIFL रिसर्चने एका अहवालात इशारा दिला आहे की, "सॅटेलाइट इंटरनेट सेवा देताना क्षमतेच्या मर्यादा अडथळा ठरू शकतात. काही ठिकाणी Starlink ने ग्राहकांची नोंदणी तात्पुरती थांबवली होती, ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे."
सध्या Starlink बांगलादेशमध्ये त्यांच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवा देत आहे, जिथे दरमहा 6,000 बांगलादेशी टका (4,200) इतका खर्च येतो. याशिवाय ग्राहकांना उपकरणासाठी सुमारे 33,000 आणि शिपिंग व हँडलिंगसाठी आणखी 2,000 खर्च करावा लागतो. त्यामुळे सुरुवातीचा एकूण खर्च सुमारे 37,200 इतका येतो.
त्याच्या तुलनेत भारतात 840 मासिक दर आणि ग्रामीण भागासाठी कमी शुल्कामुळे ही सेवा खूपच परवडणारी ठरणार आहे.
सॅटेलाइट इंटरनेटमुळे देशाच्या खेड्यापाड्यांपर्यंत जलद इंटरनेट पोहोचू शकते, जे आजवर शक्य नव्हतं. TRAI च्या निर्णयानंतर Starlink आणि इतर कंपन्यांच्या आगमनाने भारतात डिजिटल परिवर्तनाचा वेग आणखी वाढणार आहे. आता याकडे पाहायचं आहे की हे स्वप्न प्रत्यक्षात कधी आणि कसे साकारते!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.