Startup : ब्युटी प्राॅडक्ट्सच्या व्यवसायाला फ्लिपकार्टची साथ ;एकता शहा यांचा प्रेरणादायी प्रवास

ई-काॅमर्सची वाढ जशी होत गेली तशी मूळ उद्योगांना पूरक
एकता शहा
एकता शहा sakal

भारतातले लाखो लघू, मध्यम आणि मायक्रो उद्योग आपल्या व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करत असतात. ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्म त्यांना हमखास यशाच्या दिशेनं नेतं. सर्वांना उपलब्ध असलेले हे प्लॅटफाॅर्म विक्रेते, उद्योजकांना मग ते कुठल्याही पार्श्वभूमीतून आलेले असोत, बळ देतं. विविध उद्योगांशी एकाच वेळी जोडलं जाण्याची क्षमता असल्याचं हे उदाहरण आहे. ई-काॅमर्सची वाढ जशी होत गेली तशी मूळ उद्योगांना पूरक असलेल्या पॅकेजिंग, कॅटलाॅगिंग सारख्या पूरक व्यवसायांचीही वृद्धी होऊन त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे.


भारतातल्या व्यापारी वर्गाच्या हातात असलेल्या देशाच्या विकासाला बळ देण्याच्या शक्तीला एक निश्चित स्वरुप देण्यात ई-काॅमर्सचा मोठा वाटा आहे. या प्लॅटफाॅर्ममुळे लाखो व्यापाऱ्यांना नवी ताकद प्राप्त झाली आहे, याबद्दल या प्लॅटफाॅर्मचे आभारच मानायला हवेत.

याच वर्गात अग्रेसर असलेल्या फ्लिपकार्ट या ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मने उद्योजकांच्या व्यवसायांमध्ये अमुलाग्र बदल घडवत त्यांना आॅनलाईन बाजारपेठेत स्थान मिळवून दिले आहे. फ्लिपकार्टची प्रचंड व्याप्ती, ग्राहकांची संख्या आणि पाठबळ यातून अनेक उद्योजकांना प्रचंड फायदा मिळालेला आहे.


एकता शहा या मुंबईच्या महिलेने आपला ब्युटी प्राॅडक्टचा व्यवसाय फ्लिपकार्टच्या माध्यमातून सुरु केला आणि दोनच वर्षांत त्या फ्लिपकार्ट प्लॅटफाॅर्मवरच्या वरच्या क्रमांकाच्या व्यापारी विक्रेत्या बनल्या. केवळ पाच उत्पादनांपासून सुरु झालेला एकता शहांचा प्रवास आता ४० उत्पादनांपर्यंत येऊन पोहोचला आहे.


कसा होता त्यांचा प्रवास?
पहिली पायरी- आपल्या ब्रँडची स्थापना करणे आणि दुसऱ्या टप्प्यावर तो ब्रँड वाढवणे.
एकता यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका हेअर केअर प्राॅडक्टच्या कंपनीपासून केली. दोन वर्षे या कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी एका मेक-अप कंपनीत नोकरी स्वीकारली. नोकरीला लागल्यापासून केवळ तीनच महिन्यांत एकता यांनी या मेक-अप कंपनीचं बाजारपेठेतलं मुल्य दहा पटींनी वाढवलं. त्याच वेळी इतरांचे ब्रँड मोठे करण्यापेक्षा स्वतःचाच ब्रँड का सुरु करु नये, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी तरुण सराफ यांच्या मदतीनं ग्लाईट रुट व्हेंचर्स एलएलपी ही कंपनी सुरु केली.


हीच कंपनी फ्लिपकार्टवर आपली उत्पादनं गोल्ड सेलर या नावानं विकते. २०२० मध्ये त्यांनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांच्या विक्रीला सुरुवात केली. ब्युटी, ग्रुमिंग, फ्रेगनन्स, पर्सनल केअर, स्कीन केअर, मेक-अप आणि पुरुषांचे ग्रुमिग यासाठी लागणाऱ्या उत्पादनांचा यात समावेश आहे.


फ्लिपकार्ट कडून मोलाची मदत
याबाबत बोलताना एकता म्हणाल्या, "फ्लिपकार्टनं आम्हाला या सगळ्या प्रक्रियेत प्रचंड मदत केली. सेलर सपोर्ट टीम आणि व्यवस्थापक वेळोवेळी आमच्या मदतीला उभे राहिले. त्यांनी आम्हाला वेबसाईटवर फोटो अपलोड करणे, किवर्डचा वापर, फ्लिपकार्टच्या जाहिरातींचा वापर, अशाअनेक गोष्टी शिकवल्या.

आम्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून आमची कंपनी वाढवू शकलो, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, "फ्लिपकार्टवरची नोंदणी खूप सोपी आहे. केवळ तुमचा जीएसटी क्रमांक टाकून आणि व्हेरिफिकेशनची छोटी प्रक्रिया करुन तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करु शकता,"  

व्यवसाय वाढीसाठी फ्लिपकार्टचा उपयोग
एकता आणि तरुण यांनी सुरु केलेली कंपनी आज ४० जणांना रोजगार देते आहे. त्यांच्या ब्रँडची वाढही प्रचंड आहे. एकता याचे सगळे श्रेय फ्लिपकार्टला देतात. तुमचा ब्रँड वाढवणे, लाखो लोकांपर्यंत पोहोचणे आणि तुमचा व्यवसाय वाढवणे यासाठी फ्लिपकार्टहा सर्वश्रेष्ठ प्लॅटफाॅर्म आहे, असे त्या सांगतात. केवळ फ्लिपकार्टमुळेच आपला व्यावसायिक प्रवास लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन अनेकजण आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करतील आणि यशस्वी होतील, अशी अपेक्षा एकता यांनी व्यक्त केली आहे.

उद्योगाची वाढ आणि आॅनलाईन बाजारपेठेत स्थिरावणं यासाठी फ्लिपकार्टची कशी मदत होते, हे एकता यांच्या उद्योजकतेतल्या प्रवासाच्या कहाणीवरुन स्पष्ट होतं. गेल्या काही वर्षांत फ्लिपकार्टनं अनेक उद्योजकांना बाजारपेठेत स्थिरावण्यास आणि वाढण्यास मदत केली आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांतली फ्लिपकार्ट लाखो ग्राहकांची सेवा अव्याहतपणे करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com