फक्त 20 सेकंद मोकळ्या वातावरणात राहिलेल्या 'बबल बॉय' डेव्हिडची कहाणी

अनेक कारणांमुळे डेव्हिडचं नाव वैद्यक-विज्ञान विश्वात-मानवी इतिहासात कायमचं कोरलं गेलं
bubble boy david vetter
bubble boy david vetter esakal
Summary

अनेक कारणांमुळे डेव्हिडचं नाव वैद्यक-विज्ञान विश्वात-मानवी इतिहासात कायमचं कोरलं गेलं.

विशेषत: कोविडपश्चातल्या काळात रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं की दिवसाकाठी वैयक्तिक-सामुहिक आत्महत्यांच्या बातम्या वाचून डोकं सुन्न होतं. आर्थिक-मानसिक-शारिरीक अडचणींसोबतच विसंवाद-इगो यामुळं माणसं कधी स्वत:ला कधी संपुर्ण कुटुंबाला संपवतायेत. मध्यंतरी तर कर्णबधीरपणामुळे मुलाला अन् आपल्याला सतत हिणवलं जातं म्हणून एका डॉक्टरांनी स्वत:सोबत आपलं चौकोनी कुटूंब संपवून टाकलं तर एका तरुण डॉक्टर जोडप्यानं लग्नानंतर काही महिन्यातच एका पाठोपाठ एक आत्महत्या केल्या. शरीर-मन-भावभावना यांचं शिक्षण घेतलेल्या लोकांची ही अवस्था असेल तर इतरांची काय कथा?

एखादा आजार-तथाकथित न्यून इतकं जीवघेणं ठरावं? आर्थिक अडचण-इगो हे इतके भयंकर ठरावेत? लोकं कमकुवत होतायेत? उपाय कमी पडतोय? समाजव्यवस्थेचं अपयश आहे का? काहीतरी वेगळी कारणं तर नसतील? असे अनेक तर्कवितर्क लढवत आपण आजची घटना तिथंच विसरून जातो. आपण भारतीय भावनाशील असलो तरी 'भावना' हाताळण्यात अनेकदा कुचकामी ठरतो हे वास्तव बदलणार नाही. भलेही आपण, आपलं कुटूंब संपवणारी लोकं असोत वा दोनचार दिवस हळहळणारे आपण सर्व.

bubble boy david vetter
bubble boy david vetter
bubble boy david vetter
नोबेल, पद्मविभूषण जिंकणारे हरित क्रांतीचे जनक माहितीयेत का?

जाऊदेत, एक गोष्टच सांगतो. तो गर्भात असतांनाच डॉक्टरांनी त्याच्या पालकांना होणाऱ्या बाळाच्या निरोगी असण्याबद्दल ५० टक्के खात्री दिली होती. ती त्यांच्यासाठी पुरेशी होती. चुकून काही समस्या आली तर मुलीचा रक्तगट मॅच होईल या आशेनं त्यांनी बाळाला जन्म द्यायचं ठरवलं. सिझेरियनद्वारे डेव्हिडचा जन्म झाला. तो आईच्या गर्भातून बाहेरच्या जगात प्रवेश करतांना सगळ्यांसारखं रडला पण फक्त वीस सेकंद तो मोकळ्या वातावरणात राहिला. त्याला अत्यंत काळजीपूर्वक एका प्लॅस्टिकच्या पारदर्शक घुमटात बंद करण्यात आलं, कारण ज्याची भिती डॉक्टरांनी व्यक्त केली होती ती खरी ठरली होती. तो 'नैसर्गिक सदोष प्रतिकारक्षमता' घेऊन जन्माला आला.

हे गोड मुल एक दिवस-दोन दिवस-काही महिने नाही 'आपल्याला काहीतरी ठोस उपचार मिळेल' या आशेवर संपुर्ण आयुष्यभर निर्जंतूक केलेल्या प्लॅस्टिकच्या विविध कवचात राहिलं, पण दुर्दैवानं त्याला तो ठोस उपचार मिळाला नाही. हा मुलगा म्हणजे 'डेव्हिड व्हेटेर'. प्लॅस्टिकच्या घुमटात राहणारा म्हणून 'बबल बॉय' या नावानं ओळखला जाणारा 'डेव्हिड' हा सत्तर ते ऐंशीच्या दशकात टेक्सास वैद्यकिय केंद्रातील सगळ्यात जास्त लोकप्रिय रुग्ण होता.

तो प्लॅस्टिक बबलच्या कोषातच वाढला. त्याच्या उपचारार्थ प्रचंड संशोधन केलं गेलं, प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली. उणंपुरं 'बारा' वर्षांचं डेव्हिडचं आयुष्य हे मानवी इतिहासातली एक हृदयस्पर्शी गोष्ट ठरली. त्याच्या आजूबाजूची अनेक लोकं त्याला प्रोत्साहित करत, त्याच्या हिमतीची दाद देत आणि "त्याच्या या गुढ अनाकलनीय रोगाचं उत्तर विज्ञान एक दिवस जरूर शोधेल आणि तो या पिंजऱ्यातून बाहेर पडेल" अशी प्रार्थना करत होती. त्याच्या जन्मानं अन् अश्या अवघडलेल्या आयुष्यावर वैद्यकशास्त्र-नैतिकता-मानवी भावभावना या अनेक गोष्टींवर संख्य-असंख्य प्रश्नचिन्ह उभे राहिले.

bubble boy david vetter
bubble boy david vetter
bubble boy david vetter
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी कंपनीत 'बायो-बबल'चा फंडा!

नवजात अर्भक असल्यापासून त्याला फक्त प्लॅस्टिकचा स्पर्श माहित होता. दस्तुरखुद्द नासानं त्याच्यासाठी वेगवेगळे पारदर्शक कंटेनर बनवले होते.

त्याच्यापर्यंत पोहोचणारी प्रत्येक वस्तू थेट मानवी स्पर्शाशिवाय संपुर्णपणे निर्जंतूकपणे त्याच्यापर्यंत पोहोचेल अशी यंत्रणा उभारली होती. नऊ महिने आपल्या गर्भात वाढवणाऱ्या आईनंही त्याच्या जन्मानंतर त्याला एकदाही स्पर्श केला नव्हता. त्याच्या आधीही अन् त्याच्या नंतरही कुणी असं कोषात आपलं सगळं जीवन व्यतीत केलं नाही.

डेव्हिडच्या अशा अवस्थेचं कारण होतं 'गंभीर आणि संमिश्र असा रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव असलेला जन्मजात आजार'. या आजारामध्ये रुग्णात आजाराविरुद्ध लढणाऱ्या पांढऱ्या अर्थात सैनिक पेशींची कमतरता असते. या पेशी अनेक प्रकारच्या संसर्गांशी लढण्यास सक्षम असतात. या आजारावर आजही फुलप्रुफ असा कुठलाही इलाज नाही. डेव्हिड 'जिवंत प्रयोग' झाला होता. तांत्रिक मदत आणि विविध प्रयत्नांनी तो त्याच्या कुटूंबियांसह मिळालं तेवढं आयुष्य जगू शकला. त्याच्या या आयुष्याविषयी अनेक वादविवाद झालेत काहींना त्याच्यावर झालेले प्रयोग अमानवी वाटले तर काहींनी डॉक्टरांनी तो जगण्यासाठी, त्याचं जगणं अधिकाधिक सोपं होण्यासाठी औषधांशिवायही केलेले प्रयत्न महत्वाचे वाटले.

bubble boy david vetter
bubble boy david vetter
bubble boy david vetter
TRUTH Social - ट्रम्प यांचा स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

प्राप्त आणि विपरित परिस्थितीत तांत्रिक नसला तरी भावनिक विजय त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नक्कीच मिळवला होता. वैद्यकिय जगत डेव्हिडच्या केसविषयी बोलायला फारसं उत्सुक नसलं तरी डेव्हिडनं अश्या प्रकारच्या गुंतागुंतीच्या आजारांचा अभ्यास अन् आकलन होण्यासाठी पुरेपूर सहकार्य केलं. रोगप्रतिकारशास्त्र समजावून घेण्यासाठी स्वत:च्या शरीराचं योगदान दिलं. अशा प्रकारच्या आजारात काय काय उपाययोजना करता येतील, याचं ज्ञानही दिलं. त्याचं आयुष्य भले पुरेसं नसेल, चारचौघांसारखं नॉर्मल नसेल पण त्याचामुळे वैद्यकीय जगताला प्रचंड मदत झाली.

डेव्हिडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याआधीही अशा केसेस हाताळल्या होत्या, परंतू पालक उपचारास आणि प्रयोगास अनुत्सूक असायचे. त्यामुळे काही महिन्यातच ते बाळ दगावत असे, परंतु डेव्हिडचे पालक तो गर्भात असल्यापासून तर त्याच्या शेवटापर्यंत 'आशावादी' होते, त्यामुळं तो जन्मल्यानंतर त्याच्या बहीणीचा आणि त्याचा रक्तगट न जुळण्यापासून ते रोजच्या संघर्षापर्यंत डेव्हिडमुळं डॉक्टर मंडळींवर पहिल्यांदाच बरंच काही शिकायला भेटलं.

डेव्हिड मोठा होत गेला तसा तो राहत असलेल्या प्लॅस्टिकचा पारदर्शक बबल मोठा होत गेला. 'स्टार वॉर्स' त्याच्या खास आवडीचं. त्याला वयानुरूप दूरध्वनीवरून औपचारिक शिक्षण दिलं गेलं. हळूहळू हा छानसा शिस्तप्रिय अन् बोलक्या डोळ्यांचा मुलगा त्याच्यावरच्या चर्चेमुळं लोकप्रिय होत गेला. शारिरिक त्रास परवडतो पण जसं जसं तो थोडा जाणता होऊ लागला तसतस पिंजऱ्यातल्या त्या जगण्यानं अनेकदा त्याची चिडचिड होत असायची.

bubble boy david vetter
ब्राझीलचे अध्यक्ष गोत्यात; हेतुपुरस्सर गुन्ह्यासह संसद नऊ आरोप ठेवणार
bubble boy david vetter
bubble boy david vetter

"या बबलमधून आपण कधी बाहेरच पडू शकणार नाही." अश्या विचारांनी हळूहळू तो निराश होऊ लागला. डॉक्टर त्याला विश्वास देत राहिले पण आता फक्त कुठली तरी प्रोसेस त्याचा धीर रोखू शकणार होती. 'किती दिवस असं चालणार?' हा ही प्रश्न होता शेवटी डॉक्टरांनी अस्थीमज्जा रोपणाची नवीन विकसित झालेली पद्धती वापरून त्याच्या बहिणीचं सॅंपल ट्राय करायचं ठरवलं. ही शस्त्रक्रिया प्रारंभी यशस्वी वाटली पण हळूहळू डेव्हिडची तब्येत खालावू लागली, त्याला ताप येत होता. दुर्दैवानं शस्त्रक्रियेदरम्यान त्याला संसर्ग झाला होता.

डॉक्टरांनी प्रयत्नाची शर्थ केली पण लसिकेच्या कर्करोगानं पुढिल 15 दिवसात डेव्हिड त्याच्या काचेचा बबल आणि हे जग सोडून कायमचं सोडून गेला. त्याच्या आईनं मृत डेव्हिडच्या कपाळावर ओठ टेकले. हा तिचा डेव्हिडला पहिला अन् शेवटचा स्पर्श होता. वर्तमानपत्रातून टिकेचा वर्षाव झाला 'जिवंत मुलाचा केलेला गिनिपीग गेला' अशा अर्थाच्या बातम्या झळकू लागल्या.

डेव्हिड नावाच्या या 'बबल बॉय'ची ही शोकांतिका असली तरी डॉक्टरांना त्याच्यामुळं अनेक गोष्टी कळाल्या.

- 'विषाणुजन्य संसर्ग' कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो हे पहिल्यांदाच जगापुढं आलं.

- जनुकीय अभ्यासातून निदान अधिक जलद होऊ शकतं हे कळलं.

- रक्तगट जुळत नसला तरी अस्थीमज्जा रोपणाचं तंत्र विकसित झालं.

-अशा प्रकारच्या ९० टक्के केसेसमध्ये बाळ एक महिन्याचा होण्याच्या आत शस्त्रक्रिया करण्यास येऊ लागल्या.

bubble boy david vetter
मानवाला डुक्कराच्या किडनीचं दान; अमेरिकेत यशस्वी प्रत्यारोपण
bubble boy david vetter
bubble boy david vetter

अशा अनेक कारणांमुळे डेव्हिडचं नाव वैद्यक-विज्ञान विश्वात-मानवी इतिहासात कायमचं कोरलं गेलं. त्याच्यावर गाणी बनली, सिनेमा बनला, लोकांनी त्याचे चित्र काढले, शिल्प बनवले. टेक्सासमधील एका शाळेला अन् रस्त्याला त्याचं नाव देण्यात आलं. 'बबल' हा तिथल्या भाषेतील महत्त्वाचा शब्द बनला. त्याच्या थडग्याजवळील दगडावर "He never touched the world, But the world was touched by him" हे कोरलेले शब्द या बबल बॉयच्या वेगळ्याच आयुष्याची आजही आठवण करून देतात.

त्याची आई कॅरोलनं एके ठिकाणी लिहून ठेवलंय की, "पुढं इतरांचं आयुष्य अधिक सोपं होत असेल. त्यांचं दु:ख कमी होत असेल. आम्ही जे भोगलं ते त्याच्यामुळं इतर कुणाला भोगायला लागू नये, या विचारांनी जितके दिवस त्याच्यासोबत जसे काही घालवले त्यांनी पुरेपूर आनंद दिला तेवढंही आमच्यासाठी पुरेसं आहे!" 'आयुष्यात उद्या काय वाढून ठेवलंय?' हे आपल्या हातात नसतं, जे येईल त्याला मात्र आपण सकारात्मकपणे नक्कीच सामोरं जाऊ शकतो.

इमोशन्स मॅनेजमेंटचा वस्तूपाठ देणाऱ्या आनंदनंही हेच सांगूनच ठेवलंय, "बाबूमोशाय जिन्दगी बडी होनी चाहिए लम्बी नहीं" डेव्हिडची ही गोष्टही एवढं तर नक्कीच शिकवून जाते. तत्कालीन ताणतणाव-अपयश-अनारोग्य-निराशा हे आयुष्याचे भाग आहेत थेट आयुष्य नव्हे. जिन्दगीमें सबसे बडी चिज क्या हैं पता हैं?. सिर्फ जिन्दगी! १९८३ साली आजच्याच दिवशी डेव्हिडचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला होता. बारा वर्षे तो बबलमध्ये राहिला आपण बारा महिन्यात मास्कला कंटाळलो. हॅट्स ऑफ डिअर ...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com